आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Newly Elected Rajya Sabha Members To Take Oath In Chamber Of House At Delhi News And Updates

राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी:महाराष्ट्रातून शरद पवार, उदयनराजे भोसले यांच्यासह 7 जण घेत आहेत शपथ; राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान कोरोनामुळे उपस्थित राहण्याची शक्यता कमी, शपवथविधीला सुरुवात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल डिस्टन्सिंगसोबत होणार शपथविधी, प्रत्येक सदस्याला फक्त एक अतिथी आणण्याची परवानगी

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 7 जणांची खासदारपदी नियुक्ती झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले खासदारकीची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील राज्यसभा सदनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या 75 वरून 86 झाली आहे. 

महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली. त्यापैकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतील. काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव, भाजपमधील जुने जाणते नेते डॉ. भागवत कराड यांचाही शपथविधी होणार आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेसचा हात सोडून शिवधनुष्य हाती घेतलेल्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेतील. तर राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप प्रवेश केलेले छत्रपती उदयनराजे भोसलेही खासदारकीची शपथ घेतील. एकूण 61 खासदारांपैकी 43 सदस्य पहिल्यांदाच राज्यसभेत पोहोचले आहेत. 

भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे घेणार शपथ

काँग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि मल्लिकार्जुन खर्गे, झामुमोचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेने हे देखील खासदारपदाची शपथ घेणार आहेत. 

महाराष्ट्रातील सात खासदार

> उदयनराजे भोसले – भाजप

> भागवत कराड – भाजप

> रामदास आठवले – भाजप पुरस्कृत

> शरद पवार – राष्ट्रवादी

> फौजिया खान – राष्ट्रवादी

> राजीव सातव – काँग्रेस

> प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना

पहिल्यांदाच सभागृहात होणार शपथविधी 

जर संसद अधिवेशन घेत नसेल तर सभापतींच्या दालनात शपथ घेतली जाते, परंतु यावेळी पहिल्यांदाच सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी समारोहावेळी सामाजिक अंतराची विशेष काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक सदस्याला एकाच अतिथी सोबत येण्याची परवानगी आहे. ज्या सदस्यांना आज कोणत्याही कारणास्तव पोहोचता येणार नाही, त्यांना पावसाळी अधिवेशनात शपथ देण्यात येईल.

कोरोना काळात संसदेच्या स्थायी समित्यांच्या बैठका सुरू झाल्यामुळे राज्यसभेचे सभापती एम. वेंकैया नायडू यांनी नवीन सदस्यांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. नवीन सदस्य शपथ घेतल्याशिवाय सभांना उपस्थित राहू शकत नाहीत.

राज्यसभेच्या 19 जागांसाठी जूनमध्ये निवडणुका घेण्यात आल्या.

राज्यसभेच्या 19 जागांसाठी जूनमध्ये निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपला 8 आणि काँग्रेसला 8 जागा मिळाल्या. गेल्या वेळी या 19 जागांपैकी भाजपला 9 आणि काँग्रेसकडे 6 जागा होत्या. यावेळी भाजपला 1 आणि काँग्रेसला 2 जागांचे नुकसान झाले. 

राज्यसभेतील एक जागा भाजपाने गमावली असली तरी त्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत कोणतेही नुकसान झालेले दिसले नाही. राज्यसभेच्या या 19 जागांपैकी एनडीएने गेल्या वेळी 10 जागा जिंकल्या होत्या. यावेळी देखील भाजपला 8 आणि एमडीए-एमएनएफ प्रत्येकी 1 जागा मिळाली. अशा प्रकारे, 10 जागांचा एनडीएचा आकडा कायम आहे.

दुसरीकडे यूपीएला 2 जागांचे नुकसान झाले. मागील वेळी यूपीएने या 19 जागांपैकी 7 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसकडे 6 आणि राजदकडे 1 जागा होती. यावेळी काँग्रेसने 4 आणि झामुमोने 1 जागा जिंकली आहे. अशाप्रकारे यूपीएच्या खात्यात यावेळी 5 जागा आहेत.