आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी दुर्घटना:प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; 100 पेक्षा जास्त लोक बुडाले, आतापर्यंत 51 मृतदेह हाती

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट पलटी होऊन 50 हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर 60 जण बेपत्ता आहेत. हा अपघात कांगो नदीत झाला. वायव्य मोंगला प्रांताचे राज्यपाल यांचे प्रवक्ते नेस्टर मॅग्बाडो यांनी सांगितले की, 51 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 60 हून अधिक अजूनही बेपत्ता आहेत. या अपघातात 39 लोक वाचले आहेत.

यापूर्वी कांगोमध्ये 15 फेब्रुवारी रोजी एक बोट पलटी झाल्याने 60 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघातही कांगो नदीतच घडला होता. बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, यामुळे बोट बुडाली. देशाचे मंत्री स्टीव्ह मबिकायी यांनी सांगितले, की या बोटीवर 700 लोक होते. ही घटना देशातील माई-नोमडबे प्रांतात घडली होती.

बातम्या आणखी आहेत...