आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालमध्ये पुन्हा मोदी विरुद्ध दीदी:ममता म्हणाल्या - केंद्र सरकार सूडाचं राजकारण करतयं; बंगालच्या भल्यासाठी मोदींच्या पायादेखील पडू शकते

कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदींना 30 मिनिटे थांबवण्याचा आरोप चुकीचा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केंद्राच्या मोदी सरकारवर सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना तातडीने दिल्लीला बोलवण्यावरुनदेखील प्रश्न उपस्थित केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना संकटात वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकांमध्ये जाऊन काम करण्यास मुभा मिळायला पाहिजे. परंतु, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रत्येक पावलावर अडचणी निर्माण करत असल्याचा दावा ममता यांनी केला आहे.

ममता पुढे म्हणाल्या की, भाजपला हा पराभव पचवता येत नसून त्यांनी पहिल्याच दिवसापासून आम्हाला अडचणी आणण्यास सुरुवात केली आहे. कारण या सर्व घटनेत राज्याच्या मुख्य सचिवांचा काय दोष? यावरुन हे कळत की, केंद्र सरकार किती सूडाचं राजकारण करतयं. त्यामुळे मी पश्चिम बंगालच्या भल्यासाठी मोदी यांच्या पायादेखील पडायला तयार असल्याचे ममता म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींना 30 मिनिटे थांबवण्याचा आरोप चुकीचा

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी यास चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा व पश्चिम बंगालची पाहणी केल्यानंतर आढावा बैठक बोलावली होती. दरम्यान, बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी न झाल्याने हे प्रकरण आता वाढतच चालले आहे. ही आढावा बैठक पंतप्रधान मोदी यांनी प. मेदिनीपूर जिल्ह्याच्या कलईकुंडात आयोजित केली होती. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय त्याच परिसरात होते, मात्र 30 मिनिटांपर्यंत बैठकीत आले नाहीत. उशिराने आल्यानंतर ममतांनी वादळाबाबत एक अहवाल पंतप्रधानांकडे सोपवला. ममता व त्यांचे अधिकारी दुसरी महत्त्वाची मीटिंग असल्याचे सांगत बाहेर पडले.

संबंधित प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. दरम्यान, एटीएसने मला पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर उतरत असल्यामुळे २० मिनिटे उशीरा सागर बेटातून कलाईकुंडावर जाण्यास सांगितले होते. त्यानंतर कलाईकुंडावरदेखील मला 15 मिनिटानंतर उतरण्याची परवानगी देण्यात आली. तोपर्यंत पंतप्रधान तेथे पोहोचले होते. मी तिथे गेलो आणि त्यांना भेटण्याची परवानगी मागितली पण बरीच प्रतीक्षा केल्यानंतर मला त्यांना भेटायला परवानगी मिळाली.

बंगालच्या आढावा बैठकीत सीएम-अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.
बंगालच्या आढावा बैठकीत सीएम-अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.

ममता यांच्या पत्रकार परिषदेतल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी

1. विरोधी पक्षनेत्याला बैठकीत बोलविण्याचे काय औचित्य?

ही आढावा बैठक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात होणार होती. त्यामुळे मी माझा दौरा कमी करत कलाईकुंडाला जाण्याचा विचार केला. त्यानंतर बैठकीमध्ये राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनादेखील आमंत्रित केले गेले. त्यामुळे मी सभेस जाण्यास टाळल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या. तथापि, गुजरात आणि ओडिशामधील अशा सभांना विरोधी पक्षनेत्याला आमंत्रित केले गेले नाही.

2. मला बदनाम करण्याचा प्रयत्न
पंतप्रधान मोदींच्या बैठकीनंतर संध्याकाळपासून पंतप्रधान आणि गृहमंत्री कार्यालयाकडून मला बदनाम करण्याचा बातम्या व निवेदन येत होते. त्यानंतर राज्य सरकारचा सल्ला न घेता मुख्य सचिवांना अचानकपणे दिल्ली येथे बोलविण्यात आले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार नेहमीच परस्परविरोधी मूडमध्ये असतात. निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यपाल आणि अन्य नेते आक्रमक मूडमध्ये असून भाजपला आपला पराभव पचवता येत नाही आहे. त्यामुळे ते बदला घेण्याच्या राजकारणाखाली ती हे सर्व करत आहे.

3. राज्य सरकारला अशांत करण्याचा आरोप

केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना दिल्लीत बोलावून चक्रीवादळ आणि कोविड विरुद्धच्या लढाईत राज्य सरकारला अशांत करण्याचा विचार करत आहे. ममता पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारला बंगालपासून इतका त्रास होतोय का? जर माझ्यामुळे काही त्रास होत असेल तर बंगालच्या हिताकरीता मी मोदी यांच्या पाया पडत क्षमा मागयला तयार आहे. परंतु, केंद्र सरकारने असे घाणरडे राजकारण करु नये.

केंद्राने रात्री उशिरा त्यांना दिल्लीत रिपोर्ट करण्याचे आदेश दिले
केंद्र सरकारने रात्री उशिरा मुख्य सचिव बंदोपाध्याय यांना राज्यातून रिलीव्ह करून केंद्रात हजर राहण्याचा आदेश दिला. बंदोपाध्याय यांना ममता सरकारने नुकतेच 3 महिन्यांचे एक्स्टेन्शन दिले आहे. केंद्राने त्यांना सोमवारीच दिल्लीत रिपोर्ट करण्यास सांगितले. त्यावर तृणमूल खा. सुखेंदू शेखर रॉय म्हणाले, बंगालने भाजपला निवडणुकीत धडा शिकवला, यामुळे केंद्र असे आदेश जारी करत आहे. निवडणुकीपूर्वी 3 आयपीएस अधिकाऱ्यांनाही दिल्लीत बोलावले होते. यानंतर गृह मंत्रालयाने बंदोपाध्याय व डीजीपींना राज्याच्या स्थितीवर थेट अहवाल देण्यास सांगितले होते. त्यावरूनही वाद झाला.

राजनाथ म्हणाले... असे वागणे अत्यंत चुकीचे
संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले, पंतप्रधान व मुख्यमंत्री हे व्यक्ती नव्हे, संस्था असतात. आपत्तीच्या काळात लोकांची मदत करण्याच्या भावनेने आलेल्या पंतप्रधानांना अशी वागणूक देणे खूप चुकीचे व खेदजनक आहे.

  • मोदींनी ओडिशाला 500 कोटी, बंगाल व झारखंडला एकत्रितपणे 500 कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केली. ओडिशाचे मुख्यमंत्री सीएम नवीन पटनायक म्हणाले, आम्हाला कोणतेही पॅकेज नको.

ममता बॅनर्जी यांचे स्पष्टीकरण...परवानगी घेतली होती
ममता म्हणाल्या, दुसऱ्या मीटिंगची माहिती नव्हती. मोदींना अहवाल दिला. 20 हजार कोटींचे पॅकेज मागितले. त्यांची मंजुरी घेऊन बाहेर पडले. बैठकीत शुभेंदूंच्या हजेरीमुळे त्या संतप्त झाल्याचे कळते.

बातम्या आणखी आहेत...