आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्रे एकीकडे वितरणाच्या अडचणींना सामोरे जात आहेत, तर दुसरीकडे ई-पेपरची कॉपी आणि डिजिटल पायरसीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात वृत्तपत्रांच्या महसुलात मोठे नुकसान होत आहे. हे पाहता इंडियन न्यूजपेपर सोसायटीने (आयएनएस) इशारा दिला आहे की, वृत्तपत्रांच्या ई-पेपरवरून पेज डाऊनलोड करून त्याची पीडीएफ फाइल व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम वा सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रसिद्ध करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
ई-पेपर किंवा त्याचा काही भाग कॉपी करून सोशल मीडियावर अवैधरीत्या प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध वृत्तपत्रे कठोर कायदेशीर कारवाईसह मोठ्या दंडाची कारवाई करू शकतात.
ग्रुपचा अॅडमिन जबाबदार
एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये वृत्तपत्राच्या कॉपी प्रसिद्ध झाल्यास त्या ग्रुपचा अॅडमिन जबाबदार राहील. दरम्यान, आयएनएसच्या सल्ल्यानुसार वृत्तपत्र समूह वृत्तपत्राची पीडीएफ फाइल डाऊनलोड करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती करून घेण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा प्रयोग करतील. आठवड्याला एका ठराविक संख्येपेक्षा अधिक पीडीएफ डाऊनलोड करणाऱ्या यूजर्सना ब्लॉकही करता येऊ शकेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.