आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:वर्तमानपत्रेही लाेकलसाठी व्हाेकल : गिरीश अग्रवाल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भास्कर समूहाचे संचालक म्हणाले, भारतीय भाषांमधील वर्तमानपत्रांचा खप सातत्याने वाढत चालला आहे

भारतीय भाषांतील वर्तमनपत्रांचा खप सातत्याने वाढत चालला आहे. या सर्व बाजारपेठा आता सर्वच कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. काेविड -१९चा वर्तमानपत्रांच्या वाचक संख्येवर परिणाम झाला आहे, परंतु दैनिक भास्कर समूह या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आगेकूच कायम राखत भक्कमपणे पाय राेवून आहे. हे यश आणि वर्तमानपत्रांची बदललेली रीडरशिप याबाबत बाेलताना भास्कर समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल यांनी विभागीय आधारावर आता वर्तमानपत्रांनीदेखील ‘लाेकलसाठी व्हाेकल’ हे पाहिजे, असे मत व्यक्त केले.

भाषेच्या आधारावर वर्तमानपत्रांची वाचक संख्या वाढण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अलीकडेच ‘लाेकलसाठी व्हाेकल’यावर भर दिला आहे. महानगरांव्यतिरिक्त अन्य बाजारपेठांतही भारतीय भाषेतील वर्तमानपत्रांची पकड घट्ट हाेत आहे. त्यासाठी आपले स्थान भक्कम करण्याची संधी आहे, असा मला विश्वास वाटतो. भास्कर समूह या काळातही भक्कमपणे उभा आहे.

सध्याच्या स्थितीत भविष्यातील याेजनांसंदर्भात बाेलताना ते म्हणाले, आगामी काळात ग्रीन आणि आॅरेंज विभागांसाठी विभागीय आधारावर याेजना आखावी लागेल. यामुळे जाहिरातदारांनाही खर्च कमी करण्यासाठी संधी मिळेल. नुकत्याच झालेल्या बाजारपेठांच्या मॅपिंगमध्ये भास्करची उपस्थिती असलेली केवळ १७ % बाजारपेठ रेड झाेनमध्ये हाेती, तर दुसऱ्या बाजूला जवळपास सर्व महानगरांतील बाजार रेड झाेनमध्ये असल्याचे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

लाॅकडाऊनच्या काळातील सवलती वाढवताना आता सर्वात आधी ज्यांना अगाेदर लहान शहर म्हटले जाणारेे स्थानिक बाजार खुले हाेतील. त्यामुळे कंपन्यांचे लक्ष्य आता महानगरापेक्षा माेठ्या संधी असलेले स्थानिक बाजार असतील. ज्या ठिकाणी सर्वात अगाेदर खप वाढेल. काेविडचा हा नवीन कालखंड छाेट्या व मध्यम बाजारातील ग्राहकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकेल. कारण कंपन्या त्यांना आकर्षित करण्यासाठी जाेरदार प्रयत्न करतील.

वाचक संख्या कायम राखण्यासाठी भास्कर समूह काय करत आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, भास्कर राेज वाचकांना दाेन फ्रंट पेज देत आहे. यात एक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वर्तमानपत्रांचा व दुसरे राज्यस्तरीय व स्थानिक बातम्यांना प्राधान्य देणारे आहे. काेविड-१९ येण्याच्या आधीच भास्करने १३ आंतरराष्ट्रीय वार्ताहरांची नियुक्ती केली हाेती. त्यामुळे आमच्या वाचकांना जगभरातील हाॅटस्पाॅटच्या अपडेटची माहिती सर्वात अगाेदर मिळत आहे. ज्या प्रमाणे आराेग्य कर्मचारी आणि पाेलिसांनी मानवतेच्या सेवेचे दर्शन घडवले. त्याचप्रमाणे भास्कर समूहाचे पत्रकारही आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णालय, संक्रमण हाॅटस्पाॅटमध्ये जाऊन, घरी परतणाऱ्या कामगारांपर्यंत पाेहोचून लाइव्ह रिपाेर्टिंग करत आहेत. अशा वस्तुनिष्ठ वार्तांकनामुळे वाचकांमध्ये वर्तमानपत्राबद्दलची विश्वासार्हता वाढत आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘क्यू- ४’ या भारतीय वाचक सर्वेक्षणात भास्कर समूहाने वाचक संख्येच्या आधारावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, िबहार, झारखंड, चंदिगड, पंजाब आणि हरियाणात उल्लेखनीय काम केले असल्याचे दिसून आल्याकडे गिरीश अग्रवाल यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...