आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्तमानपत्र अजूनही विश्वासार्ह:66.5 टक्के लोकांनुसार वृत्तपत्र हा माहितीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत, 75.5% लोकांनुसार वृत्तपत्रातील बातम्या आणि घटनाक्रम योग्यप्रकारे असतात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाइव्ह सामना पाहिल्यानंतरही वृत्तपत्रात वाचणे आवडते, आयएएनएस आणि सी-व्होटर मीडिया ट्रॅकरचा सर्व्हे

देशातील दोन तृतीयांश म्हणजेच ६६.५% लाेकांनुसार, वृत्तपत्रे ही आजही माहितीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तथापि, २९.२% लाेक याच्याशी सहमत नाहीत. आयएएनएस आणि सी व्होटर मीडिया ट्रॅकरच्या सर्व्हेत ही बाब समोर आली आहे.

सर्व्हेत सहभागी ६३.१% लाेकांनी मान्य केले की, कोरोनानंतर वाचकांसाठी वृत्तपत्रे ही अधिक महत्त्वाची झाली आहेत. मात्र ३१.२% लोक त्याच्याशी असहमत होते. ७५.५% लोक म्हणाले, वृत्तपत्रांत सर्व बातम्या व घटनाक्रम योग्य पद्धतीने दिला जातो, यामुळे ते वृत्तपत्रांना पसंती देतात. त्याच्याशी १२.५% लोक असहमत होते. सर्व्हेत ७२.९०% लोकांनी म्हटले की, टीव्ही न्यूज चॅनल्सवरील चर्चांच्या तुलनेत वृत्तपत्रांतील बातम्या अधिक माहिती देतात. त्याच्याशी २१.५०% लाेक असहमत होते.

बातम्यांना फोनवर बातम्या सक्रियपणे शेअर केल्या जातात, असेही सर्वेक्षणात आढळले आहे. आपण जेव्हा काही महत्त्वाचे वाचताे तेव्हा ते फोनवरून इतरांशी शेअरही करतो, असे ६८.१% लोकांनी स्पष्ट केले.

लाइव्ह सामना पाहिल्यानंतरही वृत्तपत्रात वाचणे आवडते

५२.२ टक्के लोक म्हणाले, लाइव्ह सामना पाहिल्यानंतरही त्यांना त्याबाबत वृत्तपत्रांत वाचणे आवडते. ३०.२% लोकांनी मात्र असहमती व्यक्त केली. ६५% लोकांनी वृत्तपत्रांतील जाहिराती अधिक उपयोगी असल्याचे म्हटले. २४.६% त्याच्याशी असहमत होते.

> तथापि, टीव्हीची पोहोच पाहता ४०% लोकांनी वृत्तवाहिन्यांच्या माहितीला सर्वात विश्वासार्ह स्रोत मानले. मात्र २९.२% लोकांनी वृत्तपत्रांना प्राधान्य दिले. १४.९% लाेकांनी सोशल मीडिया, ४.५% ने रेडिओ व एफएम व २.५% लोकांनी वेबसाइटवर विश्वास व्यक्त केला.

> टीव्ही चॅनल्सवरील जाहिराती पाहून वस्तू खरेदी करण्याच्या प्रश्नावर ७६.५% लोकांनी असहमती, तर १९.३ % जणांनी सहमती दर्शवली. ७४.५% म्हणाले, चॅनल्सवरील जाहिराती मनोरंजनासाठीच जास्त आहेत.

> सर्व्हेत देशातील सर्व राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील ५ हजारांवर लोकांना प्रश्न विचारले होते. हा सर्व्हे यंदा सप्टेंबरच्या शेवटचा व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आला.

> सर्व्हेत ६७.५% लोकांनी म्हटले की, आयपीएल सामन्यांदरम्यान खूप जास्त जाहिराती असतात. ६५.२% लोकांनी कोणत्याही जाहिरातीविना क्रिकेट सामने पाहायला मिळावे, असे सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser