आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष : वृत्तपत्रे सुरक्षित; निश्चिंत वाचा : जागतिक आरोग्य संघटना 

aurangabad6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, ही निव्वळ अफवाच

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने नागरिक अतिरिक्त खबरदारी घेत आहेत. संपूर्ण देशभरात आता २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या घरातच बंदिस्त रहावे लागणार आहे. फावला वेळ घालवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर टीव्ही आणि वृत्तपत्रे हे दोन पर्याय आहेत. अशातच वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा सहजपणे संसर्ग होतो अशी अफवा पसरली आहे. परंतु हा दावा अगदी बिनबुडाचा, खोटा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा (डब्ल्यूएचओ) ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार वृत्तपत्रांद्वारे संसर्ग होण्याची शक्यताच फार धूसर आहे, किंबहुना वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. वृत्तपत्रे वेगवेगळ्या तापमान आणि प्रक्रियेमधून जातात. त्यामुळे त्याची लागण अथवा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे. अमेरिकेतील एका वैद्यकीय संस्थेनुसार वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अगदी नसल्यासारखेच आहे. वृत्तपत्रासारख्या पृष्ठभागावर कोरोना विषाणू जिवंत राहणे सोपे नाही.

ही खबदारी घ्या...
वृत्तपत्रांचे सामूहिक वाचन टाळा असा सल्ला अवश्य देण्यात आला आहे. लायब्ररी अथवा सोसायटीमध्ये अनेक लोकांकडून वाचली जाणारी वृत्तपत्रे शक्यतो हाताळू नये, किंवा हाताळल्यास हात अवश्य धुऊन घ्यावेत. परंतु आपल्या घरी येणारे वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. वृत्तपत्राच्या छपाईवेळीही कर्मचारी पूर्णत: खबरदारी घेत आहेत. वृत्तपत्रांना सॅनिटाइज करूनच घरपोच वाटण्यासाठी पाठवले जात आहे. आजकाल अत्याधुनिक मशीनद्वारे वृत्तपत्रांची छपाई केली जाते. ही सर्व यंत्रे स्वयंचलित आहेत. तसेच डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, सध्या लोकही वारंवार आपले हात धूत आहेत. सुमारे २० सेकंद हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांनी आपल्या घरीच राहावे, असाही सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.

0