आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:पुढील वर्षी सुमारे 70 टक्के करदाते नवी कर प्रणाली स्वीकारू शकतात

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोकरदारांनी हवे तेव्हा जुन्या वा नव्या व्यवस्थेत जावे

वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ७०% करदाते प्राप्तिकराची नवी व्यवस्था स्वीकारू शकतील. वित्त मंत्रालयातील महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, नव्या कर प्रस्तावानंतर पहिल्या वर्षी दोन तृतीयांशापेक्षा जास्त करदाते नवी व्यवस्था स्वीकारतील. अर्थव्यवस्थेत कोणताही बदल केला नाही. नव्या व्यवस्थेत करपात्र उत्पन्न मर्यादा ५ लाखावरून ७ लाख रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शननंतर ७.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे चेअरमन नितीन गुप्ता यांनी दैनिक भास्करला सांगितले की, नोकरदार करदाते कधीही नव्यातून जुन्या आणि जुन्यातून नव्या व्यवस्थेत परत येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...