आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Next Year CBSE Exams Will Change To 40% In Class 10 And 30% In Class 12 Based On Merit.

सीबीएसई परीक्षांमध्ये पुढील वर्षी बदल:10 वीत 40% व 12 वीत 30% प्रश्न पात्रता आधारित असणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीएसईच्या १० वीच्या परीक्षेत ४०% आणि १२ वीत पुढील वर्षापासून ३०% प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आकलन करणार असतील. हे प्रश्न अनेक प्रकारचे असतील. उदा. वस्तुनिष्ठ, तर्कशक्ती, केस आधारित सर्जनात्मक आदी. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी यांनी लोकसभेत सांगितले की, नवीन राष्ट्रीय धोरण-२०२० च्या उद्देशानुसार, परीक्षा प्रणालीत बदल केला जात आहे.वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या पॅटर्नसोबत हा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या क्षमता आकलनावर जास्त भर दिला जात आहे. या अंतर्गत नवीन फॉर्मेटमध्ये रीझनिंग आणि लघु उत्तरांच्या प्रश्नांना महत्त्व दिले जाईल. हा बदल २०२२-२३ वर्षांपासून लागू होईल. १० वी आणि १२ वीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू आहे.

यूजीसीचा अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रम जारीयूजीसीने अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी अभ्यासक्रम व क्रेडिट फ्रेमवर्क जाहीर केले. हे विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि लवचिक उच्च शिक्षण प्रणाली प्रदान करेल. हा अभ्यासक्रम पदवी कार्यक्रमांसाठी क्रेडिट आराखड्यासह विकसित केला.

बातम्या आणखी आहेत...