आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • NIA Action : Al Qaeda Operatives Arrested By NIA In Murshidabad, West Bengal And Ernakulam, Kerala Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनआयएची मोठी कारवाई:बंगाल आणि केरळमधून अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक; पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून सोशल मीडियावर घेतले हल्ल्याचे प्रशिक्षण

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दहशतवाद्यांवर दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची जबाबदारी सोपवली होती

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलम येथून अलकायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लोकांवर दिल्ली एनसीआर आणि वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची जबाबदारी सोपवली होती.

सुरुवातीच्या तपासात असे समोर आले की, सोशल मिडियाच्या माध्यमातून या लोकांना पाकिस्तानस्थित अल कायदाच्या दहशतवाद्यांनी कट्टरपंथी बनवले होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पश्चिम बंगालमधील लियू ईन अहमद, अबू सुफियान, नजमुक साकीब, मनुल मंडल, अल मैमुन कमल आणि पास्तूर रहमान यांचा समावेश आहे. तर मोसार्फ हुसेन, याकूब बिस्वास आणि मुर्शिद हसन हे केरळमधील एर्नाकुलम येथील आहेत.

एनआयएनुसार, त्यांना देशाच्या बर्‍याच भागात अल कायदा मॉड्यूल सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तपास संस्थेने 11 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.

शस्त्रे, स्फोटके आणि चिलखतही सापडले

ही टोळी पैसे उभा करत होती. शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी टोळीतील काही सदस्य दिल्लीला जाणार होते. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे, फायर आर्म्स, घरगुती चिलखत आणि स्फोटक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत.

यूएनच्या अहवालात भारताला इशारा देण्यात आला होता

दहशतवादाबाबत दोन महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने एक अहवाल जारी केला होता. केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या संख्येने आयएस दहशतवादी असू शकतात असा इशारा यात देण्यात आला. तसेच भारतीय उपखंडात अल कायदा (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याचा कट रचला आहे, असा दावाही अहवालात केला होता. एक्यूआयएसचा सध्या मुख्य सूत्रधार ओसामा महमूद आहे, त्याने आसिम उमरची जागा घेतली आहे. ओमरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो या भागात कट रचत आहे.

अहवालात म्हटले होते - अल कायदाचे 200 दहशतवादी असू शकतात

अहवालात आयएसच्या मदतनीस देशाने म्हटले आहे की भारतीय उपखंडात अल कायदाचे 180 ते 200 दहशतवादी आहेत. ते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील आहेत. भारतीय उपखंडात अल कायदा हा आयएसचा सहकारी आहे.

बातम्या आणखी आहेत...