आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NIA Arrested Terrorist Harpreet Singh In Ludhiana Blast Case, Fugitive Mastermind Arrested From Malaysia

लुधियाना बॉम्बस्फोट प्रकरणात NIAला मोठे यश:फरार मास्टरमाइंड हरप्रीत सिंगला मलेशियातून अटक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) फरार दहशतवादी हरप्रीत सिंग याला मलेशियातील क्वालालंपूर येथून अटक केली आहे. एनआयएने सांगितले की, पाकिस्तानस्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF)चा प्रमुख हरप्रीत हा लखबीर सिंग रोडेचा सहकारी आहे. 2021 मध्ये लुधियाना कोर्ट बिल्डिंग बॉम्बस्फोटातील तो मास्टरमाइंड होता. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता, 6 जण जखमी झाले होते.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, रोडेच्या सूचनेनुसार हरप्रीतने खास बनवलेल्या आयईडीच्या डिलिव्हरीमध्ये मदत केली होती, जो पाकिस्तानमधून भारतात त्याच्या साथीदारांना पाठवण्यात आला होता. लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्स बॉम्बस्फोटात त्याचा वापर करण्यात आला होता. अटक करण्यात आलेला आरोपी हरप्रीत सिंग हादेखील स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होता.

यापूर्वी, एनआयएने वाँटेड दहशतवादी हरप्रीत सिंग ऊर्फ ​​हॅप्पीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, ज्यांच्या विरोधात विशेष एनआयए न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंटसह लूक आउट परिपत्रकदेखील जारी करण्यात आले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हरप्रीत हा त्याच्या साथीदारासह डिसेंबर 2021 मध्ये लुधियाना कोर्ट इमारत स्फोटाचा कट रचणाऱ्यांपैकी एक होता. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
हरप्रीत हा त्याच्या साथीदारासह डिसेंबर 2021 मध्ये लुधियाना कोर्ट इमारत स्फोटाचा कट रचणाऱ्यांपैकी एक होता. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

एसटीएफने 4 जणांना केली अटक

दहशतवादी हरप्रीत सिंगच्या अटकेपूर्वी, यावर्षी मे महिन्यात पंजाब स्पेशल टास्क फोर्सने लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) पुरवल्याच्या आरोपाखाली दिलबाग सिंगला अटक केली होती. एसटीएफने बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या दिलबागसह त्याच्या आणखी तीन साथीदारांना अमृतसर येथून अटक केली होती. या तिघांवरही कोर्टात स्फोट घडवणाऱ्या बडतर्फ कॉन्स्टेबल गगनदीपला आयईडी पुरवल्याचा आरोप होता.

कटाचा खुलासा करताना एसटीएफने सांगितले की, हा स्फोट घडवण्यासाठी ड्रोनद्वारे आयईडी पाकिस्तानातून पंजाबमध्ये पाठवण्यात आला होता. एसटीएफच्या म्हणण्यानुसार, ड्रोनद्वारे तीन आयईडी पाठवण्यात आले होते, त्यापैकी एक लुधियाना स्फोटात वापरण्यात आला होता.

तपास एनआयएकडे सोपवला

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटप्रकरणी पंजाब पोलिसांनी गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या वर्षी 13 जानेवारीला तपासाची जबाबदारी एनआयएकडे सोपवण्यात आली.

एनआयएने तपासादरम्यान सांगितले की, लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव गगनदीप सिंग असे असून तो खन्ना येथील रहिवासी होता. हा स्फोट एवढा जोरदार होता की, न्यायालयाच्या आवारातील एका भिंतीला तडा गेला आणि न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या काही वाहनांच्या काचाही फुटल्या. एनआयएने सांगितले की, स्फोटाच्या वेळी जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...