आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लव जिहादप्रकरणी जाकिर नाइक आरोपी:भारतीय व्यावसायिकाच्या मुलीचे बळजबरीने बांग्लादेशी नेत्याच्या मुलासोबत लग्न लावल्याप्रकरणी एनआयएने जाकिर आणि दोन पाकिस्तानींना ठरवले दोषी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य आरोपी बांग्लादेशातील बीएनपी पक्षातील मोठ्या नेत्याचा मुलगा आहे

नॅशनल इंवेस्टिगेशन एजेंसी (एनआयए) ने एका हाय प्रोफाइल लव जिहाद प्रकरणात फरार वादग्रस्त इस्लामिक उपदेशक जाकिर नाइक आणि दोन पाकिस्तानी कट्टरतावाद्यांना आरोपी बनवले आहे. हे प्रकरण चेन्नईतील एका व्यावसायिकाची मुलगी आणि बांग्लादेशातील एका मोठ्या नेत्याच्या मुलाचे आहे. हा नेता माजी पंतप्रधान खालिदा जियाच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचा आहे.

एनआयए करत आहे तपास

एनआयए भारतीय व्यावसायिकाच्या मुलीचे बांग्लादेशातील नेत्याच्या मुलासोबत लंडनमध्ये झालेल्या लग्नाचा तपास करत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, याप्रकरणी जाकिर नाइक आणि अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानातील दोन कट्‌टरतावादी उपदेशक यासिर कादी आणि नौमान अली खानला आरोपी बनवले आहे. कादीने काही दिवसांपूर्वी जाकिर नाईकचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात नाइक म्हणतो की, भारतात सुरक्षित यायचे असेल, तर कलम 370 चे समर्थन करण्यास भारताने म्हटले आहे.

व्यावसायिकाने मुलीच्या अपहरणाचा आरोप लावला

मुलीच्या वडिलांनी मे महिन्यात चेन्नई सेंट्रल क्राइम ब्रांचमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटले होते की, माझी मुलगी लंडनमध्ये शिकत आहे. तिथे ती एका कट्टरतावाद्याच्या संपर्कात आली. तिला इस्लाम धर्म स्विकारण्यास बळजबरी करण्यात आली आणि नंतर तिचे अपहरण करुन बांग्लादेशात नेण्यात आले.

चेन्नईचे पोलिस कमिश्नर महेश कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, याप्रकरणाचा तपास परदेशात होणार आहे, त्यामुळे प्रकरण एनआयएला ट्रांसफर केले आहे. 28 मे रोजी तमिळनाडु सरकारने केंद्र सरकारला केस दाखल करण्यास सांगितले होते.

बीएनपी नेत्याचा मुलगा आहे मुख्य आरोपी

याप्रकरणी प्रमुख आरोपी बीएनपीचे माजी खासदार शखावत हुसैन बुकलचा मुलगा नफीस आहे. बकुलने 1991 आणि 2001 मध्ये नरसिंगडी-4 वरुन निवडणूक लढवली होती. त्याला डिसेंबर 2013 मध्ये खालिदा जियाच्या घरातून अटक केली होती. जून 2017 मध्ये त्याच्यावर एका व्यावसायिकाने बळजबरीने वसुली केल्याचा आरोप लावला होता.

नाइकवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

भारतात जाकिर नाइकवर मनी लॉन्ड्रिंग आणइ कट्‌टरता पसरवण्याचा आरोप आहे. अटक होण्याचा भीतीने नाइक 2016 मध्ये मलेशियाला पळून गेला होता. जून 2017 मध्ये कोर्टाने नाइकला गुन्हेगार घोषित केले. त्याच्यावर मलेशियात अल्पसंख्याक हिंदु आणि चीनी लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.