आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NIA Court Issued Warrant Against Lashkar E Taiba (LeT) Chief And 26 11 Mumbai Attack Mastermind Hafiz Saeed

टेरर फंडिंग:मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात NIA कोर्टाची कारवाई

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाफिज सध्या पाकिस्तानी तुरुंगात आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य आरोपी आहे.

दिल्लीतील राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (NIA) कोर्टाने लष्कर-ए-तोयबा प्रमुख आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी निधीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या आरोपाखाली हाफिजसह अन्य 3 जणांविरुद्ध कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

हाफिज सध्या पाकिस्तानी तुरुंगात आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य आरोपी आहे. त्यात 166 लोक मरण पावले होते. याप्रकरणी हाफिजच्या जवळच्या 3 जणांविरूद्ध वॉरंटही जारी करण्यात आले आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये टेटरर फंडिंग केसमध्ये हाफिसचे सोबती

  • जहूर अहमद शाह, कश्मीरी बिझनेसमन
  • अल्ताफ अहमद शाह उर्फ फंटूस, फूटिरतावादी
  • नवल किशोर कपूर, UAE चे बिझनेसमन

पाकिस्तानमध्येही हाफिस सईदच्या कार्यकर्त्यांवर निशाणा
पाकिस्तानच्या एका अँटी टेरररिज्म कोर्टाने गेल्या महिन्यातच जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावलीहोती. सईदसह आणखी दोन आरोपी प्रो. जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद यांना दोन प्रकरणात 5-5 वर्ष आणि दुसर्‍या प्रकरणात 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला 1,10,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला. सर्व जंगम व स्थावर मालमत्ता जप्त केली होती.

चॅरिटीच्या बहाण्याने हाफिज दहशत पसरवत होता
हाफिज सईद लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी यूएस वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने या संघटनेचा समावेश परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत केला होता. 2002 मध्ये पाकिस्तान सरकारनेही लष्करवर बंदी घातली होती. त्यानंतर हाफिज सईदने जमात-उद-दावा ही नवीन संस्था स्थापन केली. आता तो या संस्थेला चॅरिटी असल्याचे सांगत दहशतीसाठी पैसे गोळा करतो. हे पैसे दहशत पसरवण्यासाठी वापरतात.

बातम्या आणखी आहेत...