आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NIA Raids 16 Places In Jammu And Kashmir, Cracks Down On VHO Magazine For Inciting Youth

दिल्लीत सुरक्षेबाबत अलर्ट जारी:जम्मू-काश्मिरात 16 ठिकाणांवर NIA चा छापा, तरुणांना भडकावण्याच्या आरोपात VOH मॅगझीनच्या ठिकाणांवर कारवाई

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत सुरक्षेबाबत अलर्ट जारी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) 'व्हॉईस ऑफ हिंद' मासिकाचे प्रकाशन आणि आयईडी जप्त केल्याप्रकरणी जम्मू -काश्मीरमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले. एजन्सीने श्रीनगर, अनंतनाग, कुलगाम आणि बारामुल्ला येथे नऊ ठिकाणी छापे टाकले. VOH नावाचे हे ऑनलाइन मासिक फेब्रुवारी 2020 पासून प्रकाशित होत आहे. त्याच्या प्रकाशकांवर घाटीतील मुस्लीम तरुणांना मासिकांद्वारे कट्टरतावादाकडे ढकलल्याचा आरोप आहे. हे जिहादी पत्रिका चालवणारे बराच काळापासून तपास यंत्रणेला चकमा देत होते. ही वेबसाइट वेगवेगळ्या व्हीपीएन क्रमांकाद्वारे चालवली जात आहे.

दिल्लीत सुरक्षेबाबत अलर्ट जारी
सणासुदीपूर्वी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाजार, हॉटेल आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती वाढवण्यात आली आहे. याशिवाय भाडेकरूंच्या पडताळणीवर भर दिला जात आहे. अहवालानुसार, सणावारांच्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या कटाबद्दल माहिती मिळाली आहे. अशा स्थितीत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...