आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारी:आयएस संबंधित प्रकरणात एनआयएचे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात 8 जागी छापे

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात एका ठिकाणी कारवाई, महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी दहशतवादी संघटना आयएसशी संबंधी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील एकूण ८ जागी छापेमारी केली. या कारवाईत तपास संस्थेला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

पहिले प्रकरण इस्लामिक स्टेट-खुरासान प्रांत (आयएसकेपी) याच्याशी संबंधित आहे. त्यात दोन्ही राज्यांत पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. मध्य प्रदेशातील सिवनीत चार व महाराष्ट्रातील पुण्यात एके ठिकाणी ही कारवाई झाली. संशयित तल्हा खानला पुणे व अक्रम खानच्या सिवनी येथील घरांची झडती घेतली. एनआयएनुसार दिल्लीतील आेखला येथून जहानजैब सामी वानी व त्याची पत्नी हिना बशीर बेग या काश्मिरी दांपत्याच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा संबंध आयएस केपीशी होता. तपासादरम्यान तपास संस्थेला एक अन्य आरोपी अब्दुल्ला बासितची भूमिकाही दिसून आली. कारण तो एक इतर प्रकरणात तिहार तुरुंगात कैद होता. तपास संस्थेने दुसऱ्या प्रकरणात कर्नाटकच्या शिवमोगा आयएस षड््यंत्रप्रकरणी सिवनीच्या तीन ठिकाणीदेखील झडती घेण्यात आली. त्यात संशयित अब्दुल अजीज सलाफी व शोएब खानच्या व्यावसायिक व घर परिसराचाही समावेश होता. सलाफी सिवनीच्या जामिया मशिदीत मौलवी आहे आणि शोएब स्पेअर पार्ट््सचे काम करतो. एनआयएनुसार हे दोघेही मुस्लिम समुदायात द्वेष निर्माण करणाऱ्या विचारांचा प्रसार करून त्यांना कट्टरवादी करण्याचा प्रयत्न करत होते.

बातम्या आणखी आहेत...