आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाचा धोका:उल्फाकडून आसाम ते दिल्ली तरुणांची भरती, एनआयए करणार संघटनेचा तपास

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाममध्ये बंदी असलेली नक्षली संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (इंडिपेंडंट) म्हणजे उल्फा-आय पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. - Divya Marathi
आसाममध्ये बंदी असलेली नक्षली संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (इंडिपेंडंट) म्हणजे उल्फा-आय पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

आसाममध्ये बंदी असलेली नक्षली संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (इंडिपेंडंट) म्हणजे उल्फा-आय पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविषयी गृह मंत्रालयाचा एक अहवाल समोर आला आहे. उल्फा-आय आसामसोबतच दिल्ली-एनसीआर तसेच देशातील इतर ठिकाणी तरुणांची भरती करून त्यांना नक्षली प्रशिक्षण देत आहे.

काही महिन्यांत संघटनेने १५० तरुणांची भरती केली आहे. उल्फा अपहरणासोबतच सुरक्षा दल व सामान्य नागरिकांवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास सोपवला आहे. पोलिस व काही इतर गुप्तचर संस्थांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोठ्या संख्येने तरुण संघटनेत सामील होत आहेत. ग्रामीण भागात तसेच राजधानी गुवाहाटीच्या काही भागात तरुण बेपत्ता होणे आणि त्यानंतर ते उल्फा-आयमध्ये सामील झाल्याचे वृत्त येत आहे.

फेसबुक ग्रुप बनवला, तरुणाची फसवणूक

विश्वसनीय सूत्रानुसार सरकारसोबत शांती चर्चेची इच्छा व्यक्त करणारी ही ४० वर्षे जुनी संघटना पुन्हा डोके वर काढण्याच्या प्रयत्नात आहे. उल्फा-आयने आपला फेसबुक ग्रुपही तयार केला आहे. त्याद्वारे आपल्या नेटवर्कच्या साह्याने तरुणांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी दुर्गम भागातील गावागावात जात आहेत. अतिशय गरिबी, पायाभूत सुविधांच्या अभावात जगणाऱ्या लोकांना संघटनेशी जोडण्याचे प्रयत्न होऊ शकतात.

चहा मळ्यात ४० लाख मजूर, भवितव्य अंधारात

इंग्रजांच्या काळापासून आसामचे चहा मळे आहेत. त्यात सुमारे ४० लाखांहून जास्त मजूर व त्यांची कुटुंबे जोडलेली आहेत. त्याशिवाय इतर लोकांचाही उदरनिर्वाह अवलंबून आहे. या वर्गाच्या कष्टामुळेच उगवणाऱ्या चहाच्या बळावर जगभरात आसामची विशिष्ट आेळख आहे. चहा मजुरांची परिस्थिती सुधारावी यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या या स्थितीचा फायदा आसाम तसेच पूर्वोत्तरच्या इतर राज्यांत सक्रिय नक्षली संघटनांनी मात्र घेतला.

  • आसाम पोलिसांच्या कडक निगराणीमुळे नक्षली संघटना भारताजवळील म्यानमारच्या सीमेत नवी प्रशिक्षण छावणी चालवत आहे.
  • तेथील वाहतुकीसाठी नागा भागातून जावे लागते. तेथे काही गावांत उतरण्याची सोय आहे.
  • अशा ठिकाणी म्यानमार सीमेत एनएससीएन संघटनेवर रेशन-पाण्यासह इतर रसदीसाठी अवलंबून.
  • त्याच्या बदल्यात दरवर्षी मोठी रक्कम नाग संघटनेला द्यावी लागते.

हेर समजून उल्फाने गेल्या महिन्यात २ जणांना ठार केले

पोलिसांचा हेर समजून गेल्या महिन्यात उल्फा-आयचा म्होरक्या परेश बरुआने दोन जणांना ठार केले. याची जबाबदारी एका स्थानिक सॅटेलाइट चॅनलने स्वीकारली होती. त्याची पुष्टी होऊ शकली नाही. अलीकडे आसाम सरकारने शिक्षक तसेच इतर सरकारी पदांवर भरती केली. परंतु चहा मळ्याच्या क्षेत्रात अशा भरतीचा अभाव आहे. त्यातच नक्षली संघटनांत भरती जोरात आहे. चहा मळ्यातील लोक ही गोष्ट खुलेपणाने सांगत नाहीत. वास्तविक पेंगिरी व काकोपथार हे उल्फाचे गड मानले जातात. त्याच्या परिसरातील २०-३० गावे विकासापासून दूर आहेत. त्यांच्या हाती शस्त्रे सोपवून त्यांना जंगलात पाठवणे सोपे आहे. अशा तरुणांची आई-वडील उल्फा-आयचा म्होरक्या परेश बरुआ याच्याकडे विनंती करण्यापलीकडे काही करू शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...