आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) टेरर फंडिंगप्रकरणी आरोपपत्रात मोठा खुलासा केला आहे. दाऊद आणि त्याचा साथीदार छोटा शकील पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असल्याचे NIA ने म्हटले आहे. NIAच्या म्हणण्यानुसार, दाऊदने पाकिस्तानातून 25 लाख रुपये दुबईत हवालाद्वारे सुरत आणि त्यानंतर मुंबईला पाठवले आहेत. हे पैसे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना पाठवण्यात आले आहेत. अशाप्रकारे दोघांनी गेल्या चार वर्षांत हवालाद्वारे 12-13 कोटी रुपये पाठवले आहेत.
याचा साक्षीदार हा सुरतस्थित हवाला ऑपरेटर असून त्याची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान असे समोर आले आहे की, रशीद मारफानी ऊर्फ रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचे काम करत होता, जेणेकरून वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे पैसे दुबईतून भारतात यायचे.
आरोपपत्रात दाऊद, शकील व्यतिरिक्त इतरही नावांचा समावेश
आरोपपत्रात दाऊद, छोटा शकील, त्याचा मेहुणा सलीम फ्रूट, आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांची नावे आहेत. शेवटच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. NIAने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून 25 लाख रुपये भारतात कसे पाठवले गेले. NIAने दावा केला आहे की, शब्बीरने 5 लाख रुपये ठेवून घेतले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. 9 मे 2022 रोजी शब्बीरच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे NIAने म्हटले आहे.
अनेक शहरे दाऊदच्या टार्गेटवर, दंगलीसाठी पैसे पाठवले
डी-कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या NIAच्या आरोपपत्रानुसार, भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला देशातील बडे राजकारणी आणि अनेक बड्या व्यक्तींनी लक्ष्य केले आहे. एवढेच नाही, तर भारतातील विविध शहरांमध्ये दंगल घडवण्यासाठी दाऊदने डी कंपनीला मोठी रक्कमही पाठवली होती. त्यामध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई पहिल्या यादीत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.