आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NIA's Major Crackdown On Organized Gangs; Raid In 60 Places In Four States Including Delhi, Accused Of Providing Money To Terrorist Activities

छापे:संघटित टोळीवर एनआयएची मोठी कारवाई; दिल्लीसह चार राज्यांत 60 ठिकाणी छापे

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात संघटित गुन्हेगारांचे नेटवर्क उद्‌ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था, एनआयएने दिल्लीसह ४ राज्यांत छापे टाकले. एनआयए काही दिवसांपासून कारवाईची तयार करत होते. सोमवारी सकाळी दिल्ली, एनसीआरसह पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात ६० ठिकाणी कारवाई सुरू केली. छापेमारी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे आणि अन्य दस्तऐवज जप्त केले. एनआयए पाकिस्तानातून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीत पंजाबची टोळी सहभागी असणे आणि त्या पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असण्याबाबतही तपास करत आहे. सूत्रांनुसार, या टोळ्या बळजबरीने वसुली, खंडणी, ड्रग्ज तस्करीसारख्या संघटित गुन्ह्यांत सहभागी आहे. एनआयएने गुंड्यांच्या टोळीची यादी तयार करण्यास सुरुवात केली होती. यातील काहींचे दहशतवादी संघटनांशी संबंध असून टेरर फंडिंग करत आहेत. लॉरेन्स बिश्नोई खलिस्तानी अतिरेकी हरविंदरसिंग रिंडाचा निकटवर्तीय आहे. तो सध्या पाकिस्तानात आहे.

मुसेवालाच्या हत्येनंतर टोळीयुद्धाचा धोका दिल्लीत नीरज बवाना टोळीचा प्रमुख नीरज सहरावत यांच्या घरावर छापा टाकला. नीरज टोळीचे सध्या लॉरेन्स टोळीविरुद्ध टोळीयुद्ध सुरू आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या काही तासांनंतर नीरजने या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा केली होती. एनआयए दिल्लीत गँगस्टर टिल्लू ताजपुरियाच्या घरी दाखल झाली. लॉरेन्स गँगच्या काही सदस्यांनी पंजाब आणि हरियाणा येथील काही घरांवर छापे टाकले.

बातम्या आणखी आहेत...