आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Night Curfew Now Possible In Delhi! Kejriwal Government Informs High Court About Restrictions

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विषाणूचा वाढता संसर्ग:दिल्लीत आता रात्रीची संचारबंदी शक्य! केजरीवाल सरकारने हायकोर्टात दिली निर्बंधाबद्दलची माहिती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत आता रात्रीची संचारबंदी शक्य!

दिल्लीत काेराेना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन रात्रीची संचारबंदी लागू केली जाऊ शकते. त्यावर विचार केला जात आहे. केजरीवाल सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली. न्यायमूर्ती हिमा काेहली यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने सरकारला रात्री किंवा आठवड्याच्या अखेरीस संचारबंदी लागू करण्याची याेजना आहे का? अशी विचारणा केली हाेती. त्यावर दिल्ली सरकार म्हणाले, संचारबंदीवर निर्णय झालेला नाही, परंतु त्यावर सक्रियतेने चर्चा केली जात आहे. दिल्लीत काेराेनाचे रुग्ण आणखी वाढले तर काही निर्बंध जरूर लागू केले जाऊ शकतात.

केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात राज्यांना रात्रीची संचारबंदी किंवा शनिवारी-रविवारी िनर्बंधात सवलत दिली आहे. परंतु लाॅकडाऊनआधी परवानगी घ्यावी लागेल.

पंजाबने काेराेना दुसऱ्या लाटेचा विचार करून संपूर्ण राज्यात १ ते १५ डिसेंबरदरम्यान रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हाॅटेल, रेस्तराँ, मंगल कार्यालय रात्री ९.३० वाजेपर्यंत बंद राहतील. पंजाबच्या आधी राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड व मध्य प्रदेशात रात्री संचारबंदी लागू केली जाऊ शकते.

दिल्ली सरकारला फटकारले
अरविंद केजरीवाल सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले. विवाह समारंभात ५० लाेक सहभागी व्हावे यासाठी काही दिशानिर्देश जारी केले आहेत का? काेविड-१९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेचे सरकारने काय केले? हा पैसा एखाद्या चांगल्या कामासाठी वापरला जावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून राेकड वसूल करण्याएेवजी एक पाेर्टल तयार करावे. अनेक लाेकांनी प्राण गमावल्यानंतर काेर्टाने फटकारल्यानंतर दिल्ली सरकारने आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढवली.

मुलांच्या आराेग्याशी तडजाेड नाही
दिल्लीचे आराेग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, मुलांच्या आराेग्याबाबत पूर्णपणे खबरदारी घेणे आवश्यक आहे. ताेपर्यंत शाळा सुरू हाेणार नाहीत. तूर्त तरी शाळा उघडण्याची याेजना नाही. लवकरच लस उपलब्ध हाेईल, अशी आम्हाला आशा वाटते.

मंत्री गाेपाल राय यांना काेराेना
पर्यावरणमंत्री गाेपाल राय यांना काेराेना संसर्ग झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. संसर्ग झालेले दिल्लीचे ते तिसरे मंत्री आहेत. याआधी उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया, आराेग्यमंत्री सत्येंद्र जैनही बाधित झाले. राय यांनी दिवाळीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याचे सूत्रांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser