आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निहंगांनी भर रस्त्यात युवकाला कापले:मारहाणीदरम्यान पगडी पडल्याने हत्या, अमृतसरमधील घटनेचा तपास सुरू

अमृतसर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबच्या अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक युवक आणि दोन निहंगांमध्ये भांडण झाले. भांडणात एका निहंगाची पगडी पडली आणि त्यानंतर दोन निहंगांनी एका शीख युवकाच्या साथीने रागाच्या भरात त्या युवकार तलवारीने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मृत हरमनजीत सिंह (35) तरनतारन रोड चाटीविंडचा रहिवासी आहे.
मृत हरमनजीत सिंह (35) तरनतारन रोड चाटीविंडचा रहिवासी आहे.

ही घटना कोट माहना सिंह रोडवरील आहे. तरनतारन रोड चाटीविंड निवासी हरमनजीत सिंह(35) रात्री घराकडून सुवर्णमंदिराकडे जात होता. रस्त्यात एका हॉटेलसमोर तो उभा होता. तेव्हा दोन निहंग तिथून जात होते. त्यांचा हरमनजीत सिंह यांच्यासोबत काही कारणामुळे वाद झाला. दोन्ही निहंग व एका शीख युवकाने हरसिमरनला मारहाण सुरू केली, यादरम्यान एका निहंगाची पगडी पडली. यानंतर निहंगांनी रागाच्या भरात त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. युवक पळून जायला लागल्यावर किरचने त्याच्या छातीवर वार केला.

घटनास्थळावर वरीष्ठ पोलिस अधिकारीही पोहोचले. त्यांनी स्थानिकांची चौकशी केली.
घटनास्थळावर वरीष्ठ पोलिस अधिकारीही पोहोचले. त्यांनी स्थानिकांची चौकशी केली.

हरमनजीतचा जागेवरच मृत्यू
दोन्ही निहंगांनी हरमनजीत सिंहवर धारदार शस्त्रांनी असे वार केले की त्याचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर आरोपी तिथून पळून गेले. जोपर्यंत पोलिस तिथे पोहोचले तोपर्यंत हरमनजीतचा मृत्यू झाला होता.
घटना सीसीटीव्हीत कैद
हरमनजीतवरील हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. निहंगांची ओळख पटवली जात आहे. आरोपींना पकडण्यात येईल. सध्या मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी कारवाई केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...