आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ninety Percent Of Kashmiri Pandits Left Their Homes Overnight After The Killings, Latest News And Update

​​​​​​​अनंतनागची पंडित कॉलनी ओसाड:हत्येच्या सत्रामुळे 90 टक्के काश्मिरी पंडितांनी रातोरात सोडले घर; म्हणाले -संयम संपला

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खोऱ्यात सातत्याने होणाऱ्या हत्यांनंतर काश्मिरी पंडितांनी आपली घरे सोडण्यास सुरुवात केली आहे. पीएम पॅकेजमधून मिळालेल्या अनंतनागमधील मट्टन स्थित पंडित कॉलनीत स्मशान शांतता पसरली आहे. दिव्य मराठीशी बोलताना काश्मिरी पंडित रंजन ज्योतिषी यांनी सांगितले की, अनंतनागमधील मट्टनच्या काश्मिरी पंडित कॉलनीतून 90% लोक निघून गेलेत. लोकांच्या संयमाचा बांध फुटला असून, रातोरात त्यांनी पलायन केले आहे.

ही कॉलनी पीएम पॅकेज योजनेंतर्गत बांधण्यात आली. तिथे येथे काश्मिरी पंडित समुदायाचे सरकारी कर्मचारी राहतात. पम, गत काही दिवसांपासून झालेल्या हत्यांनंतर सर्वजण आपापल्या घराकडे रवाना झालेत. परिस्थिती सुधारल्यानंतरच ते आता परतण्याची शक्यता आहे.

कॉलनीत आता केवळ 10 टक्के पंडित उरलेत. ते प्रशासनाकडे सुरक्षेची याचना करत आहेत. त्यांनी सुरक्षित स्थळांपर्यंत जाण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
कॉलनीत आता केवळ 10 टक्के पंडित उरलेत. ते प्रशासनाकडे सुरक्षेची याचना करत आहेत. त्यांनी सुरक्षित स्थळांपर्यंत जाण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, अनंतनाग व कुलगामच्या अनेक भागांतील काश्मिरी पंडितांनी खोरे सोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. काश्मीरमध्ये राहुल भट्ट यांच्या हत्येपासून पंडितांची निदर्शने सुरू आहेत. अनंतनागमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडित अविनाश यांनी सांगितले की, सुरक्षेची ठोस उपाययोजना होईपर्यंत आमची येथून हलवण्याची व्यवस्था केली जावी.

सरकारचा सुरक्षित स्थळी पोस्टिंग करण्याचा निर्णय

जम्मू काश्मीर प्रशासनाने धोक्यांची चिन्हे ओळखून काश्मिरी प्रवासी व जम्मू विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांची 6 जूनपर्यंत सुरक्षित स्थळी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वांना जिल्हा मुख्यालयात शिफ्ट केले जाईल. तथापि, जम्मू मोठ्या प्रमाणात डेरा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची टार्गेट किलिंग होत असल्याचा आरोप केला आहे.

मट्टन कॉलनीतील अविनाश यांनी येथे राहण्यासारखे वातावरण राहिले नसल्याचे सांगितले. आमचा सरकारवर विश्वास नसल्याचेही ते म्हणालेत.
मट्टन कॉलनीतील अविनाश यांनी येथे राहण्यासारखे वातावरण राहिले नसल्याचे सांगितले. आमचा सरकारवर विश्वास नसल्याचेही ते म्हणालेत.

22 दिवसांत 9 हत्या

खोऱ्यात यंदा अतिरेक्यांनी 20 नागरिकांची हत्या केली. यातील 9 हत्या गत 20 दिवसांत झाल्यात. यात 5 हिंदू व 3 सुरक्षा दलांचे जवान होते. हे जवान सुट्टीवर घरी परतले होते. अतिरेक्यांनी एका टीव्ही अभिनेत्याचीही हत्या केली होती. गुरुवारी लोकल टेररिस्ट ग्रुप काश्मीर फ्रीडम फायटरने (केएफएफ) एका निवेदनाद्वारे सर्वांची गत अशीच होणार असल्याची धमकी दिली आहे.

खोऱ्यातील सर्वात मोठे पलायन

1990 साली खोऱ्यात काश्मीरी पंडितांचे सर्वात मोठे पलायन झाले होते. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, 1990 मध्ये 219 काश्मिरी पंडित मारले गेले होते. त्यानंतर पंडितांचे पलायन सुरू झाले. एका अंदाजानुसार त्यावेळी सुमारे 1 लाख 20 हजार पंडितांनी खोऱ्यातून पळ काढला होता.

बातम्या आणखी आहेत...