आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीच्या अडचणींत वाढ:प्रत्यार्पणाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे दरवाजे बंद; लंडन हायकोर्ट म्हणाले - अपिलाची गरज नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. हाय कोर्टाने गुरुवारी त्याला सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यास नकार दिला. यामुळे त्याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

हाय कोर्टाने दिले होते प्रत्यार्पणाचे आदेश

लंडन हाय कोर्टाने फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. या आदेशांना मोदींची ब्रिटीश सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची इच्छा होती. पण हाय कोर्टाने त्याला वरच्या कोर्टात जाण्यासंबंधी कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

हाय कोर्टाच्या 2 न्यायाधीशांनी नीरव मोदीची याचिका धूडकावून लावली. आपल्या याचिकेत नीरवने आपल्या खराब मानसिक आरोग्याचा दाखला देत भारताकडे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला होता.

पुढे काय होणार?

  • नीरव मोदीसाठी कायदेशीर मार्ग जवळपास बंद झालेत. याचा अर्थ आपल्या प्रत्यार्पणाविरोधात त्याला ब्रिटनच्या कोणत्याही कोर्टात जाता येणार नाही. हो, पण ब्रिटनमध्ये मानवाधिकाराच्या मुद्यावर पेच पडू शकतो.
  • आता ब्रिटीश सरकार (गृह मंत्रालय) त्याचे प्रत्यार्पण रोखू शकते. पण त्याने असे केल्यास भारत त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागू शकते. त्यामुळे नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण होणे जवळपास निश्चित आहे. पण यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
  • दुसरीकडे, भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी उताविळ असणारे ब्रिटीश सरकार नीरव मोदीचे प्रत्यार्पण रोखून भारताची नाराजी ओढावून घेऊ शकत नाही. यामुळेही नीरव मोदीला भारतात आणण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.
  • नीरव मोदी ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वातील सरकारकडे राजकीय आश्रय मागू शकेल असाही एक अंदाज आहे. पण आर्थिक गुन्हेगार असल्यामुळे या प्रकरणी त्याला दिलासा मिळण्याची फार कमी शक्यता आहे.
  • नीरव मोदीपुढे युरोपियन कमीशन ऑफ ह्यूमन राइट्समध्ये दाद मागण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. एका ब्रिटीश विधी तज्ज्ञाच्या माहितीनुसार, नीरव हे प्रकरण लांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. त्यामुळे त्याचे भारताकडे केव्हा प्रत्यार्पण होईल हे आताच सांगणे अवघड आहे. ही लढाई कायद्यापेक्षा जास्त डिप्लोमसीची आहे.

हाय कोर्टाने फेटाळला नीरवचा युक्तिवाद

सुनावणीत न्यायाधीशांनी नीरव मोदीने आपल्या याचिकेत केलेले सर्वच युक्तिवाद अनावश्यक असल्याचे स्पष्ट केले. भारतात पाठवल्यानंतर तो आत्महत्या करण्याची कोणतीही जोखीम नसल्याचेही कोर्टाने मान्य केले. तसेच त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करणे अन्यायपूर्ण नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाच्या मते, नीरव मोदीला कायदेशीर प्रक्रियेचा भाग बनण्यासाठी भारतात पाठवणेच योग्य ठरेल.

असे आहे प्रकरण

पंजाब नॅशनल बॅंकेची 177.17 कोटी डॉलर म्हणजेच 11, 356 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बॅंकेने या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात सीबीआयकडे 2 तक्रारी दाखल केल्या आहेत. देशातील डायमंड किंग म्हणून ओळख असलेल्या नीरवची फोर्ब्सच्या श्रीमंत यादीत स्थान पटकावले होते. केट विन्सलेटपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत हॉलिवूड, बॉलिवूड स्टार्सने त्याचे हिऱ्याचे दागिने घालून जाहिरात केली होती.

बातम्या आणखी आहेत...