आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirav Modi Extradition UK India Update | Punjab National Bank (PNB) Scam Latest News And Updates

भारतात येणार PNB घोटाळ्यातील आरोपी:ब्रिटिश गृह मंत्रालयाची नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मान्यता, कोर्टाने म्हटले- मुंबईतील ऑर्थर रोड जेल त्याच्यासाठी चांगली

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने म्हटले होते- भारतात नीरवला न्याय मिळेल

PNB घोटाळ्यातील मोस्ट वॉन्टेड हीरे व्यापारी नीरव मोदीचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटेनच्या गृह मंत्रालयाने मोदीच्या भारत प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. फेब्रुवारीत ब्रिटेनच्या वेस्टमिन्सटर कोर्टात नीरवच्या प्रत्यर्पणाबाबत अखेरची सुनावणी झाली होती. कोर्टानेही नीरवला भारतात पाठवण्याची परवानगी दिली आहे.

जज सॅमुअल गूजीने म्हटले होते की, नीरवला भारतात सुरू असलेल्या प्रकरणा उत्तर द्यावे लागेल. नीरवविरोधात पुरावे असल्याचेही त्यांनी मान्य केले होते. 2 वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर भारत प्रत्यार्पणास मंजुरी देण्यात आली होती. नीरव मोदीवर PNB बँकेतील 14 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर तो जानेवारी 2018 मध्ये भारत सोडून पळून गेला होता.

कोर्टाने म्हटले होते- भारतात नीरवला न्याय मिळेल

जजने पुढे म्हटले की, नीरव मोदीला भारतात पाठवत आहोत, म्हणजे त्याला न्याय मिळणार नाही, असे नाही. सुनावणीदरम्यान नीरवची मानसिक स्थिती ठिक नसल्याच्या युक्तीवादाचे खंडन केले. याशिवाय, नीरवसाठी मुंबईतील ऑर्थर रोड जेलचा बॅरक नंबर-12 योग्य असल्याचे म्हटले. 19 मार्च, 2019 ला अटक झालेल्या नीरव मोदीवर मनी लॉन्ड्रिंग, पुरावे मिटवणे आणि साक्षीदारांना धमकवल्याचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...