आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirav Modi Sister Purvi Turns East As Government Witness, Sends Rs 17 Crore From UK Account To ED

PNB घोटाळा:नीरव मोदीची बहीण पूर्वी मेहता झाली सरकारी साक्षीदार, ब्रिटनच्या आपल्या खात्यातून ED ला पाठवले 17.25 कोटी रुपये

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब नॅशनल बँक (PNB)च्या 13,500 कोटी घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीची बहीण पुर्वी मेहता सरकारी साक्षीदार झाली आहे. त्यांनी यूकेमधील त्यांच्या बँक खात्यातून 17.२5 कोटी रुपये प्रवर्तन संचालनालयाकडे (ED) ट्रान्स्फर केले आहेत.

पुर्वी म्हणाल्या, 'मला माहिती आहे की यूकेमध्ये माझ्या नावावर बँक खाते आहे. मी हे खाते उघडले नव्हते किंवा त्यात जमा केलेली रक्कम माझी नाही, म्हणून मी हे पैसे भारत सरकारकडे ट्रान्स्फर केले आहेत.

पुर्वी मोदी यांना माफी मिळाली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या पूर्वी मेहता यांनी यावर्षी 4 जानेवारी रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक प्रकरणाशी संबंधित विशेष न्यायालयात अर्ज केला होता. अर्जाद्वारे पूर्वी यांनी घोटाळ्यासंबंधी माहिती तपास यंत्रणेला देण्याची विनंती केली होती. कोर्टाने हा अर्ज काही अटींसह मान्य केला होता.

यामध्ये पूर्वी यांना बँक घोटाळ्यासंदर्भात योग्य व संपूर्ण माहिती द्यावी लागेल असे सांगण्यात आले होते. पूर्वी यांनी ही अट मान्य केली होती. यानंतर ईडीने पूर्वी मोदी आणि त्यांचे पती मयंक मेहता यांना चौकशीतून दिलासा देत माफी दिली आहे.

तपासणी प्रक्रिया आणि शर्तींनुसार पैसे पाठवले
पूर्वी मेहता आणि मयंक मेहता यांनी या घोटाळ्यासंदर्भातील प्रत्येक माहिती तपास यंत्रणेला देण्याची अट मान्य करून यूके बँक खात्यातून सुमारे 17.25 कोटी रुपये भारत सरकारकडे पाठवले आहेत. हा पैसा फरारी हिरा व्यापारी नीरव मोदीचाच मानला जाईल.

तपस यंत्रणेने एका निवेदनात सांगितले की, “24 जून रोजी पूर्वी यांनी आम्हाला सांगितले की लंडनमध्ये त्यांच्या नावावर एक बँक खाते आहे, जे त्यांचा भाऊ नीरव मोदी यांच्या सांगण्यावरून उघडण्यात आले होते. हे पैसे पूर्वी यांचे नाहीत." पूर्वी यांना संपूर्ण आणि योग्य माहिती देण्याच्या अटीवर माफी देण्यात आली असल्यामुळे त्यांनी यूकेच्या एका बँक खात्यातून 23,16,889.03 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 17.25 कोटी रुपये भारत सरकारकडे पाठवले आहेत. हे पैसे नीरव मोदीचे मानले जातील.

बातम्या आणखी आहेत...