• Home
  • National
  • Nirbhnaya's advocate Seema said ban pornographic sites across the country

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीवर लटकावणाऱ्या महिला वकील म्हणाल्या, देशभरात अश्लील साइटवर बंदी घाला

  • मुंगेरच्या संग्रामपूर भागातील पाैरिया गावात आहे सीमांचे सासर, पती दिल्लीमध्ये आयआयटीची तयारी करवून घेतात

दिव्य मराठी

Mar 24,2020 10:41:00 AM IST

शशी सागर

पाटणा - सात वर्षे आणि तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लढाईनंतर, २० मार्च रोजी निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. अपराध्यांना फाशीवर आणण्यासाठी अधिवक्ता सीमा समृद्धी कुशवाह यांनी रात्रंदिवस एक केले. सीमा मूळच्या उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील आहे. पण त्या बिहारची सून असल्याचे फार कमी लोकांना ठाऊक आहे. सीमांचा पती राकेश हे मुंगेरच्या संग्रामपूर भागातील पौरिया गावात राहणारे आहे. दिल्लीत आयआयटीची तयारी करणाऱ्या संस्थेमध्ये गणिताचे शिक्षक आहेत. हा संघर्ष खूप कठीण असल्याचे सीमा म्हणाल्या. बऱ्याच वेळा माझे डोळे ओलसर झाले. खटला लढताना अनेकदा आजारी पडली. पण पती राकेश सर्व काळ माझ्याबरोबर राहिले.

निर्भया प्रकरणात माेफत लढल्या, ही त्यांची पहिली केस हाेती

कानपुर येथून एलएलबी व इलाहाबाद येथून पत्रकारिता केल्यावर सीमा युपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला आल्या.२०११ मध्ये युपीएससीच्या अभ्यासक्रमात काही बदल झाला. सीमा मेन्स पर्यंत तर पाेहचल्या पण त्यांना यश मिळाले नाही. त्याचवेळी २०१२ मध्ये निर्भया क्राैर्य प्रकरण समाेर अाले. निर्भयाला न्याय देण्यासाठी हाेत असलेल्या धरणे- निदर्शनात त्या सहभागी हाेऊ लागल्या. त्यावेळी त्या निर्भयाची आई आशा देवी व वडिल बद्रीनाथ सिंह यांच्या जवळ आली.

लैंगिक शिक्षण गरजेचे. इंटरनेटचा गैरवापर हाेऊ नये :

सीमा म्हणाल्या, आज अगदी लहान मुलांच्या हातात मोबाइल आहे. कधीकधी याचा गैरवापर केला जातो. पोर्न साइट्सवर देशभर बंदी घातली पाहिजे. तसेच मुलांसाठी लैंगिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे. पालकांनी मुलांशी मैत्री केली पाहिजे आणि प्रत्येक हातात इंटरनेटचा गैरवापर रोखला पाहिजे. निर्भया प्रकरणाच्या तपासादरम्यान या आरोपींना पाॅर्नचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे.

वडिलांच्या निधनानंतर अार्थिक चणचणीत शिक्षण :

सीमाने गरिबीमध्ये दिवस व्यतीत केले. वडिलांचे २००२मध्येच निधन झाले हाेते. काेणत्याही सुविधा नसताना सीमाचे शिक्षण झाल्याचे कुटुंबीय सांगतात. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी इटावातून इंटर केले. नंतर अजितमल काॅलेजमधून पदवी घेतली. पैशाच्या चणचणीमुळे प्राैढ शिक्षण विभागात कंत्राटी नाेकरीही केली. मग दिल्लीला गेल्या.

या लढाईत आधी चंपारणच्या सर्वेशचीही साथ :

अगाेेदर चंपारणचे समाजसेवक सर्वेशनेही निर्भयाच्या कुटुंबीयांना साथ दिली. निर्भयाच्या अाईवडिलांनी निर्भया ज्याेती ट्रस्टची स्थापना केली.ज्याची कायदेशीर सल्लागार सीमा अाहेत. ७ वर्षांपूर्वी मी माझी मुलगी गमावली. पण या लढाईत मला अशी अनेक लाेक भेटली जी अाज माझ्या कुटुंबाचा भाग अाहे असे निर्भयाची अाई म्हणते.

X