आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirmala Sitharaman | Finance Minister On Jammu Kashmir State Hood Restoration I The Finance Minister First Gave The Signal I Latest News And Update 

जम्मू काश्मीरला लवकरच मिळेल राज्याचा दर्जा:अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधी संकेत दिले, मग प्रकरण हाताळले

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संकेत दिले की, केंद्र सरकार पुन्हा जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबत विचार करित आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमात पुढे बोलताना त्यांनी केंद्रांकडून राज्यांना दिला जाणाऱ्या निधीबाबत देखील सांगितले. दरम्यान, जेव्हा जम्मू काश्मीर पुन्हा राज्य बनेल, असे संकेत सीतारामन यांनी बोलता बोलता दिले. तेव्हा त्यांनी पुन्हा आपले वाक्य मागे घेतले. सीतारामन म्हणाल्या की, भविष्यात जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळू शकतो. त्यामुळे तेथील निधीबाबत देखील वेगळा विचार केला जाईल.

कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन
कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन

राज्याला दिल्या जाणाऱ्या निधीची दिली माहिती

'केंद्र-राज्य संबंध-सहकारी संघराज्य : आत्मनिर्भर भारताचा मार्ग' या शीर्षकाच्या कार्यक्रमाअंतर्गत निर्मला सीतारामन बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 व्या वित्त आयोगाचा अहवाल पूर्णपणे स्वीकारला आहे. त्यामुळे आज 42 टक्के कर राज्यांना दिला जातो. ते सध्या 41% कमी आहे. कारण जम्मू-काश्मीर आता राज्य नाही. परंतू त्याला लवकरच राज्याचा दर्जा मिळू शकतो. असे सीतारामन म्हणाल्या.

भाजप, बिगर भाजप राज्यांत फरक करत नाही

  • निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भ्रष्टाचार न करता पारदर्शकतेने मी माझे काम करत आहे. मी भाजपशासित राज्ये आणि बिगर भाजपशासित राज्यांमध्ये फरक करत नाही. सर्व जनतेचा सरकारवर विश्वास असला पाहिजे. त्यांचा स्वतःच्या ताकदीवर आणि सरकारच्या सामर्थ्यावर विश्वास असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच याचा प्रचार करतात. आम्ही सहकारी संघराज्यावर चर्चा करत आहोत.
  • त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, सर्वप्रथम जनतेचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. यात कोणतेही राज्य वेगळे नाही. तुम्ही असे म्हणून शकत नाही की मोदीजी तुम्ही हे काम चुकीचे करत आहात. कारण राज्य सरकार याला पाठिंबा देत नाही. त्यात अविश्वास ठेवण्यासारखे काही नाही. पीएम मोदी हे मुख्यमंत्रीही राहिले आहेत, त्यामुळे केवळ पदावर बसण्याचा त्यांचा दृष्टिकोन राहिला नसून आपल्या कामांनी त्यांनी सर्व लोकांचा विश्वास जिंकला आहे.
बातम्या आणखी आहेत...