आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसदेत सोमवारी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. विरोधकांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यनाचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की संसदेतील काही लोक देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळत आहेत. भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र विरोधकांना यामुळे त्रास होतोय.
संसदेत काँग्रेस खासदार आणि निर्मला सीतारामन यांची प्रश्नोत्तरे वाचा
काँग्रेसचा प्रश्न - खासदार रेवनाथ रेड्डींनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारले की केंद्राला केवळ सरकार वाचवण्याचीच चिंता आहे. रुपयाचे सतत अवमूल्यन होत आहे. मात्र त्याची काहीही चिंता नाही. काँग्रेस सरकारमध्ये जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया 66 रुपयांवर होता तेव्हा भाजपचे नेते म्हणायचे की रुपया आयसीयूत गेला आहे. आयसीयूच्या पुढे दोन मार्ग असतात. एक मार्ग बरे होऊन घरी येण्याचा आणि दुसरा थेट शवागाराचा. आता रुपया तर थेट शवागारात गेला आहे. मला अर्थमंत्र्यांना विचारायचे आहे की रुपयाला बरे करून घरी आणण्याची काही योजना आहे का?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उत्तर - काँग्रेसच्या कार्यकाळात केवळ रुपयाच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच आयसीयूत होती. कोरोना संकट, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरही भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. यामुळे संसदेत बसलेल्या काही लोकांना मात्र जळजळ आणि त्रास होतोय. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर गर्व व्हायला हवा, त्याची थट्टा मस्करी केली नाही पाहिजे.
डिंपल यादव यांनी घेतली खासदारकीची शपथ
दरम्यान नुकत्याच मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या खासदार डिंपल यादव यांनीही सोमवारी खासदारकीची शपथ घेतली. त्या पती अखिलेश यादव यांच्यासह संसदेत आल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.