आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्पीय भाषणावरील चर्चे उत्तर दिले. यादरम्यान त्यांनी पुन्हा जावई शब्दाचा उल्लेख करत सोनिया आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. सीतारमण यांनी राहुल गांधींना देशाचा विध्वंसक म्हणून संबोधले. राहुल अनेक मुद्द्यांवर खोट्या गोष्टी सांगतात आणि तो देशाचा विनाश करणारे व्यक्ती असल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या. निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेतही जावई शब्दाचा वापर केला होता.
यावेळी अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींच्या हम दो आणि हमारे दो या विधानावर देखील उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, "हम दो आणि हमारे दो चा अर्थ आहे की, दोन लोक पक्ष सांभाळतील आणि इतर दोन लोक आहेत ज्यांना सांभाळायचे आहे, ते म्हणजे मुलगी आणि जावई. परंतु आम्ही असे करत नाहीत. आम्ही 50 लाख स्ट्रीट ट्रेडर्ससाठी एका वर्षापर्यंत 10 हजार रुपये दिले आहेत. हे स्ट्रीट वेंडर्स कुणाचेही घनिष्ठ मित्र नाहीत."
निर्मला एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, "असे लोक जे आमच्यावर सतत आरोप करतात की आम्ही जवळच्यांसाठी काम करतो, त्यांना सांगू इच्छिते की, स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर योजना निकटवर्तीयांसाठी नाही. तिकडे जावयांना त्या राज्यांमध्ये जमिनी दिल्या गेल्या जिथे काही पक्षांची सत्ता होती. या देशातील जनता आमची निकटवर्तीय आहेत."
आपल्या भाषणात आणखी काय म्हणाल्या निर्मला
महामारीतही सुधारणेसाठी काम केले : सीतारमण म्हणाल्या की, "सरकारने महामारीतही प्रोत्साहन आणि सुधारणा यांसारखे काम केले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही या देशातील विकास टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांवर निर्णय घेण्यापासून सरकारला कोणी रोखू शकत नाहीत. शशी थरूर येथे उपस्थित आहेत. केरळमध्ये जेव्हा त्यांच्या पक्षाचे सरकार होते तेव्हा या लोकांनी एका जवळच्या व्यक्तीला बोलावले आणि कोणतीही निविदा न काढता एका बंदराच्या विकासाचे काम दिले. आणि हे लोक आम्हाला क्रोनी कॅपिटिलिस्ट म्हणतात."
स्वनिधी योजनेमुळे गरीबांना लाभ : सीतारमण म्हणाल्या की, "पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे गरिबांना लाभ झाला आहे. दलित आणि मागासवर्गीयांना याचा फायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनुभवांवर हा अर्थसंकल्प आधारित आहे. हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक बळकटी देणारा आहे. महामारी असतानाही देश आत्मनिर्भर बनेल. अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या सुधारणांमुळे भारताचा जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्था होण्याचा मार्ग मोकळा होईल."
कोरोनावरील नियंत्रणामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली: सीतारमण म्हणाल्या की, "या अर्थसंकल्पात साथीच्या साथीच्या दरम्यानही संधी शोधण्यात आली आहे. जगातील अनेक देशांत कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. भारतात कोरोनावरील नियंत्रणामुळे अर्थव्यवस्थेने गती पकडली आहे. आम्ही पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारताच्या ध्येयाकडे एक पाऊल उचलले आहे."
कोरोना संकट सुद्धा सरकारला सुधारणा करण्यापासून रोखू शकलेले नाही: सीतारमण म्हणाल्या की, "कोविड-19 महामारीमुळे सरकारसमोर अनेक प्रकारचे आव्हाने होती. सरकारने या आपत्तीचे संधीत रुपांतर केले. कोरोना संकट सुद्धा सरकारला सुधारणा करण्यापासून रोखू शकलेले नाही, ज्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि देशाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी आवश्यक आहेत."
गरज भासल्यास ग्रामीण रोजगारासाठी अधिक निधी देऊ : अर्थमंत्री म्हणाल्या की, "सरकार ग्रामीण रोजगार वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. गरज भासल्यास सरकार ग्रामीण रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मनरेगा सारख्या योजनांसाठी अधिक निधी देऊ. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात मनरेगासाठी 73 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.