आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NITI Aayog On Organic Farming & Cow Dung Fertilizer Usage | NITI Aayog Task Force Report

निती आयोगाकडून गोमूत्र-शेणाचा अहवाल:म्हटले- शेतीत वापर वाढविण्याची गरज, रासायनिक खते मानवी आरोग्यास हाणीकारक

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात निती (NITI) आयोगाने शुक्रवारी गोमूत्र व शेणासंदर्भात अहवाल सादर केला. या अहवालात म्हटले आहे की, शेतीसाठी शेण आणि गोमूत्र आधारित फॉर्म्युला मोठ्या प्रमाणात वापरले जावे. यासोबतच गोशाळांना आर्थिक अनुदान देऊन मदत करावी. निती आयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी हा अहवाल साजरा केला. ते म्हणाले की, दक्षिण आशियाई शेतीचे अनोखे सामर्थ्य म्हणजे पशुधन हे पिकांमध्ये विलीन आहे.

गेल्या 50 वर्षांत अजैविक खतांच्या वापराचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. याचा माती, अन्न गुणवत्ता, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. सेंद्रीय आणि जैव खतांच्या उत्पादन आणि संवर्धनासोबतच गोशाळांमध्ये सुधारणा करायला हवी, असेही या अहवालात म्हटले आहे.

गायीचे वेस्टेज सर्कुलर अर्थव्यवस्थेचे उदाहरण
डॉ. निलम पटेल यांनी सांगितले की, भारतातील पारंपरिक शेतीमध्ये गुरेढोरे हा महत्त्वाचा भाग आहे. नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गोशाळा मदत करू शकतात. गुरांपासून तयार होणाऱ्या कचऱ्याने कृषी रसायने बदलली जाऊ शकतात. डॉ. पटेल म्हणाले की, तगुरांच्या कचऱ्याचा वापर हे चक्राकार अर्थव्यवस्थेचे उदाहरण आहे, ज्यामुळे उत्पन्नाची कल्पना देखील वाढीस लागली.

'वेस्ट टू वेल्थ' उपक्रमासाठी सूचना
या टीमने शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि वेस्ट टू वेल्थ उपक्रमात गोशाळांची भूमिका याविषयी त्यांचे अनुभव आणि मते शेअर केली. गोशाळांची आर्थिक व्यवस्था सुधारण्याच्या या सूचना होत्या.

सरकार सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देते
अलीकडे सरकार सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत शेतीला प्रोत्साहन देत आहे. जैव आणि सेंद्रिय निविष्ठांच्या पुरवठ्यासाठी संसाधन केंद्रे म्हणूनही गोशाळा कार्यरत आहेत, जे नैसर्गिक आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

बातम्या आणखी आहेत...