आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nitin Gadkari | Nitin Gadkari Advice To Narendra Modi Government; Given License For Covid Vaccine Manufacture

आपल्याच सरकारला गडकरींचा सल्ला:​​​​​​​केंद्रीय मंत्री म्हणाले - एका ऐवजी दहा कंपन्यांना लस बनवण्याचे लायसन्स द्या, आपली गरज पूर्ण झाल्यानंतर निर्यातही करा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गडकरी यांनी सल्ल्यानंतर स्पष्टीकरण दिले

लसीच्या तुटवड्याविषयी केंद्रीय रस्तेविकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी आपल्याच सरकारला सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, सरकारने एका ऐवजी 10 कंपन्यांना व्हॅक्सीन बनवण्याची परवानगी द्यावी. गडकरी मंगळवारी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते. यावेळी त्यांनी ही सूचना केली.

गडकरी म्हणाले - पुरवठ्यापेक्षा जास्त लस देण्याची मागणी होत असेल अडचण येणारच आहे. एका कंपनीऐवजी लस उत्पादनासाठी सरकारने 10 कंपन्यांना मान्यता द्यावी. त्यांना देशात पुरवठा करु द्यावा आणि मग जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त लस येतील, मग या कंपन्या परदेशात निर्यात करतील. हे काम 10-15 दिवसांत केले पाहिजे.

गडकरी यांनी सल्ल्यानंतर स्पष्टीकरण दिले
गडकरी म्हणाले की, जेव्हा मी काल या गोष्टी बोलत होतो तेव्हा मला माहिती नव्हते की रसायन व खत मंत्री मनसुख मंडाविया यांनी लस उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती यापूर्वी दिली होती. तसेच त्यांनी मला सांगितले की सरकार 12 वेगवेगळ्या प्लांट आणि कंपन्यांमध्ये लस तयार करत आहे. मी त्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की तुमची टीम योग्य दिशेने कार्य करत आहे.

वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भरता आवश्यक: गडकरी
गडकरी म्हणाले की, अजूनही भारताला औषधांसाठीचा कच्चा माल परदेशांकडून मागवावा लागतो. आम्हाला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत भारतातील सर्व जिल्हे स्वयंपूर्ण असावीत. ते म्हणाले की, देशातील आरोग्य क्षेत्र सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. महामारी काळात सकारात्मक राहताना आपल्याला मनोबल मजबूत ठेवले पाहिजे.

कॉंग्रेसची टीका
गडकरी यांच्या सूचनेवर कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाला की त्यांचा बॉस हे सर्व ऐकत आहे का? 8 एप्रिल रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही अशीच एक सूचना केली होती.

केजरीवाल यांनीही तेच सुचवले होते
यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले होते. यामध्ये लसीचे उत्पादन वाढवता यावे यासाठी केंद्राने लस बनवणार्‍या दोन्ही कंपन्यांचे फॉर्म्युला इतर औषधी कंपन्यांना द्यावे, असे ते म्हणाले होते. सध्या दोन कंपन्या देशात कोरोना लस तयार करत आहेत. पहिले भारत बायोटेक (कोवाक्सिन) आणि दुसरी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (कोविशील्ड).

बातम्या आणखी आहेत...