आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील एक्सप्रेस वेवर लागणाऱ्या टोल टॅक्सचे आपणच कर्ते करविते असल्याची कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. '1990 च्या दशकाच्या अखेरीस राज्यमंत्री म्हणून मीच महाराष्ट्रात प्रथम टोल लागणारे रस्ते तयार केले,' असे ते म्हणाले.
राज्यसभेच्या एका सदस्याने शहराच्या हद्दीतील एक्सप्रेस वेवरुन जाताना टोल द्यावा लागत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना नितीन गडकरींनी यावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. एखाद्या छोट्या शहरात येण्यासाठीही नागरिकांना टोल द्यावा लागतो. हे योग्य नाही. सरकार या समस्येवर काम करत आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे गडकरी म्हणाले.
काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप
ही समस्या काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली. 2014 पूर्वी शहरी क्षेत्रालगत टोलनाका उभा करण्यात येत होता. त्याचा फटका आजही जनतेला सोसावा लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवी व बेकायदा गोष्ट आहे. शहरातील नागरिक एक्सप्रेस वेवर केवळ 10 किमीचा प्रवास करतात. पण त्यांच्याकडून 75 किमी अंतराचा टोल वसूल केला जातो, असे गडकरी म्हणाले.
सुदैव म्हणा की दुर्दैव, मीच या टोलचा जनक आहे. देशात मीच पहिल्यांदा टोल व्यवस्था सुरू केली. 1995 व 1999 दरम्यान मी महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. तेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे योजना सुरू करण्यात आली होती. आता आम्ही या व्यवस्थेतील दोष दूर करण्यावर काम करत आहोत, असे गडकरी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.