आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला आहे. भाजपला राज्यसभा खासदार स्वामींनी म्हटले की, पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात लढाईची कमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सोपवली पाहिजे. त्यांनी ट्विटरवर या विषयी लिहिले आहे.
एका यूजरने गडकरींना या युद्धाची कमान सोपवण्याचे कारण विचारले तर स्वामी म्हणाले - कोविडचा सामना करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या फ्रेम वर्कची गरज आहे आणि गडकरींनी या प्रकरणात स्वतःला सिद्ध केले आहे.
भारत महामारीविरोधात लढाई जिंकेल - स्वामी
त्यांनी लिहिले की - भारत या महामारीविरोधात लढाई जिंकेल, जशी मुस्लिम आक्रमक आणि ब्रिटिश घुसखोरांच्याविरोधातील लढाई जिंकली होती. जर कठोर पावले उचलण्यात आली नाही तर आपल्याला तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो. ज्यामध्ये लहान मुलांवर जास्त प्रभाव पडू शकतो. अशा वेळी मोदींनी कोरोनाविरोधातील लढाईची कमान नितीन गडकरींकडे सोपवली पाहिजे. पंतप्रधान कार्यालयावर विश्वास ठेवणे निरर्थक आहे.
स्वामींनी दिले स्पष्टीकरण - PMO वर टीका केली, PM वर नाही
आपण केलेल्या टीकेवर स्वामींनी स्पष्टीकरण दिले की, त्यांनी PMO वर टीका केली आहे, जो एक विभाग आहे. पंतप्रधान हे स्वतः हा भाग नाही. मात्र जेव्हा एका यूजरने स्वामींना म्हटले की, आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पदावरुन हटवले पाहिजे, तर त्यांनी नकार दिला. स्वामींनी यावर नकार देत म्हटले की, नाही... नाही... हर्षवर्धन यांनीही फ्री हँड सोडायला नको. पण ते एवढे विनम्र आहेत की, अधिकाऱ्यांना सख्तीने बोलू शकत नाही. गडकरींसोबत ते जास्त चांगल्या पध्दतीने काम करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.