आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष मुलाखत:केंद्राच्या कृषी कायद्यांत शेतकरीविरोधी काय आहे यावर कुणीही बोलत नाही; भाजपमुळे राजकीय बेरोजगारी ओढवलेल्या नेत्यांनीच याबाबत संभ्रम पसरवला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वीलेखक: धर्मेंद्रसिंह भदौरिया
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहोत, लवकरच या प्रकरणावर तोडगा काढू : नितीन गडकरी

कोरोनानंतर देशातील चित्र वेगाने बदलत आहे. विकासकामांपासून ते लहान उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रे वेगाने रुळावर येत आहेत, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. धडाकेबाज विकासकामांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरींशी दैनिक भास्करने विशेष संवाद साधला. या वेळी त्यांनी २०२१ मधील उद्दिष्टे व सरकारच्या विशेष प्रकल्पांबाबत माहितीही दिली. दिवसाला ४० किमी राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्याशी चर्चेचा संपादित भाग...

कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे, यावर काय तोडगा असू शकतो?
विमानाच्या तिकिटाचे दर विमान कंपन्याच ठरवतात. मग शेतकऱ्यांना पिकांचे मूल्य आणि ठिकाण ठरवण्याचा हक्क का मिळू नये? करार पद्धतीवरील शेतीत करार करणारा जमीन कसू शकेल, बियाणे, खतांसह सर्व खर्च करेल. पिकाच्या उत्पन्नातून खर्च वगळता शेतकऱ्यांना ठरलेला मोबदला देईल. यात अंबानी किंवा अदानींना जमीन विकण्याचा प्रश्न येतोच कुठे? सातबाऱ्यात कुठलाही बदल होणार नाही.

शेतकऱ्यांची समजूत का काढू शकत नाही?
आमच्यामुळे अनेक जण राजकारणात बेरोजगार झाले आहेत. तेच संभ्रम पसरवत आहेत. कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात काय आहे यावर कुणीही बोलत नाही. कुठे अडचण असल्यास ती सुधारण्यास आम्ही आहोत.

सरकारच्या देखरेखीत दुधाची यंत्रणा आहे, तशी भाजीपाला-पिकांसाठी का नाही?
हेच तर मॉडेल आहे. संत्री १२ रुपये किलो होती. मी फार्मर प्रोड्युसिंग सोसायटी बनवून सहा कंटेनर ३० रुपये किलोने दुबईत पाठवले, तर २० कंटेनर पाठवत आहोत. अधिकार दिल्यास शेतकरी हे काम करू शकतात. सरकार सहकार्य व पाठिंबा देण्यास तयार आहे. याचप्रमाणे उसाच्या रसापासून, मळीपासून इथेनॉल बनवले जाईल. आपण पेट्रोलमध्ये २२% इथेनॉल टाकू शकतो. यासाठी १६०० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. हे ६५ रुपये लिटरने मिळेल, जे पेट्रोलपेक्षा स्वस्त असेल.

वाहन स्क्रॅप धोरण केव्हा येईल?
माझ्या विभागातून स्क्रॅप धोरणाला परवानगी मिळाली आहे. पुढील आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिल-मेदरम्यान हे धोरण लागू होईल.

कार २० वर्षे जुनी आहे, मला काय मिळेल?
पुढील पाच वर्षांत देशात जगातील प्रत्येक ब्रँड असेल. येथे ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हब असेल. यात जुन्या वाहनांचे अॅल्युमिनियम, स्टील, रबर व कॉपरची पुनर्निर्मिती होईल. शंभर रुपयांत तयार होणारा पार्ट ६० रुपयांत होईल. जुन्या कारच्या मोबदल्यात स्क्रॅपची किंमत मिळेल.

जून तिमाहीत राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा वेग १८ किमी होता, जो लक्ष्यापेक्षा कमी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात आम्ही मागे नाही. कोविडसारख्या बिकट स्थितीतही आमचा वेग ठीक आहे. यावर्षी मार्चअखेरपर्यंत आम्ही ३० किमीच्या पुढे जाऊ, तर पुढील वर्षी दिवसाला ४० किमी वेग असेल. आपल्या देशात पाच वर्षांत ३० लाख कोटींचे रस्ते होतील. आम्ही ६० हजार किलोमीटर महामार्गाचे काम पाच वर्षांत पूर्ण करू. दिल्ली-मुंबई १२ पदरी महामार्ग बनवत आहोत, जो दोन वर्षांत पूर्ण होईल.

चार धाम प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आहे, पर्यावरण-भूमी अधिग्रहणासंबंधित अडथळा येत आहे का?
८२६ किलोमीटरच्या योजनेत सुमारे २५ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. १५ प्रकल्प पुढील चार ते सहा महिन्यांत पूर्ण होतील. काही प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झाले नाही. सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. पुढील १० दिवसांत अंतिम निकाल येऊन कामाला सुरुवात होण्याची आशा आहे. आजपासून एक वर्षाच्या आत चार धाम प्रकल्प पूर्ण करू. यानंतर पिथौरागडाहून मानसरोवरापर्यंत जाता येईल.

हाय सेक्युरिटी नंबर प्लेट देशात कधी लागू होईल?
हे सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केले आहे आणि सर्व राज्यांना हे पूर्ण करावे लागेल. राज्य सरकारे हे लवकर अमलात आणतील अशी आशा आहे. हे देशाच्या सुरक्षेसाठी चांगले ठरेल.

ई-वाहनांसाठी बॅटरी व चार्जिंगचे आव्हान आहे, अजूनही वाहने महाग आहेत?
हे लोकप्रिय ठरत आहे. ई-बाइक, ई-रिक्षा, ई-बस, ई-कार वाढल्या आहेत. यामुळे पायाभूत सुविधांवरही सरकार वेगाने काम करत आहे.

आरटीओ भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याचे तुम्ही म्हटले होते, यात सुधारणा कशी करणार?
आम्ही मोटार वाहन कायदा पारित केला आहे. राज्य सरकारांनी हा लागू केल्यास देशातील परिवहन क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त होऊ शकेल. पारदर्शकता येईल. लोकांना घरबसल्या परवाना मिळेल. सध्या वाहन परवाना कॉम्प्युटरवरूनही मिळतो.

महाराष्ट्रात अधूनमधून भाजप सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चा होतात, सद्यःस्थितीत भाजप सरकार स्थापन करेल का?
मला याबाबत माहिती नाही. सात-आठ महिन्यांत मुंबईत गेलेलो नाही.

बातम्या आणखी आहेत...