आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुकीत आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःच ही घोषणा केली. महाआघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत नितीश म्हणाले - 2025 ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात लढली जाईल. माझे लक्ष्य 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यावर आहे. माझी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्याची इच्छा नाही.
माझ्यानंतर तेजस्वींचे नेतृत्व असेल
अर्थमंत्री व जदयुचे ज्येष्ठ नेते विजय चौधरी यांनी सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्यानंतर तेजस्वी यादव यांचे नेतृत्व असेल असे स्पष्ट केले. त्यानुसार 2025 ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढली जाईल.
विजय कुमार चौधरी दारुबंदीविषयी म्हणाले की, दारुबंदीच्या निर्णयाला सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी सर्वच नेत्यांपुढे स्पष्ट केली. आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कोणतेही औचित्य नाही. यावर सवाल उपस्थित करणाऱ्या नेत्यांन ही गोष्ट लक्षात घ्यावी.
नितीश म्हणाले होते - तेजस्वीला पुढे न्यायचे आहे
नालंदात सोमवारी डेंटल कॉलेजच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, आम्ही तर केव्हापासून बिहारचा विकास साधण्याचे काम करत आहोत. पण आता तेजस्वींना पुढे करण्याची वेळ आली आहे. जेवढे करायचे होते तेवढे आम्ही केले. आता यांच्याकडून एकेक काम करवून घ्यायचे आहे. त्यासाठी आता हे सर्वकाही पाहत आहेत, समजून घेत आहेत. एकेक काम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, सरकार नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सर्वोतपरी पाऊले उचलत आहे. मुलभूत सोईसुविधा, शिक्षण, औषधी व जनतेचे उत्पन्न वाढवण्यावर आमचा जोर आहे.
दुसरीकडे, JDU च्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या नेत्यांनी 2024 प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत नमूद केली आहे. त्यांच्या मते, मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. त्यांच्यात नेतृत्वात 2024 ची लोकसभा निवडणूक लढली जाईल. आता त्यांच्या या मागणीला राजदच्या नेत्यांचाही साथ मिळाली आहे.
चुकीचा युक्तिवाद केला तर अधिकारी ऐकणार नाहीत
राजदचे आमदार राहुल तिवारी यांनी यावेळी सांगितले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर भाष्य केले. तसेच अधिकाऱ्यांची तक्रार करणाऱ्या आमदारांनाही समज दिली. काही आमदारांनी अधिकारी आपले ऐकत नसल्याची तक्रार केली. त्यावर कुमार यांनी चुकीचा युक्तिवाद केला तर अधिकारी कुणाचेच ऐकत नाहीत असे त्यांना सांगितले. सन्मान हवा असेल तर चुकीचे काम करणाऱ्यांची साथ सोडा असेही त्यांनी त्यांना सांगितले.
2013 मध्ये म्हणाले होते - आम्ही मातीत जाऊ, पण भाजपसोबत जाणार नाही
मार्च 2013 मध्ये भाजपपासून फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, आम्ही मातीत मिसळू, पण भाजपसोबत जाणार नाही. आता हा चॅप्टर क्लोज झाला आहे. भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय मी भावनेच्या भरात नव्हे तर विचारपूर्वक घेतला आहे. नितीश कुमार यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर हे मत व्यक्त केले होते.
आता नितीश-तेजस्वींचे काही फोटो पाहा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.