आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. सोमवारी दुपारी ४ ते ४.३० च्या दरम्यान राजभवनात त्यांचा शपथविधी होईल. नितीशकुमार हे सातव्यांदा शपथ घेणारे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. तिकडे भाजप राज्यात मोठा राजकीय फेरबदल करू शकतो. बिहारमध्ये या वेळी दोन उपमुख्यमंत्री असू शकतात. कटिहारचे आ. ताराकिशोर प्रसाद व बेतियाच्या आ. रेणू देवी यांची नावे चर्चेत आहेत. माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना आता केंद्रात संधी मिळेल. मोदींनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, “भाजप व संघ परिवाराने मला ४० वर्षांच्या राजकीय जीवनात भरभरून दिले. पुढेही जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन. कार्यकर्ता हे पद कोणी हिरावू शकत नाही”
रविवारी रालोआच्या बैठकीत नितीश यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. निरीक्षक म्हणून संरक्षणमंत्री राजनाथसिंह, बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व बिहार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते.
16 ते 17 मंत्र्यांचा शपथविधी शक्य
रालोआतील विकासशील इन्सान पक्षाचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांच्यानुसार, मुख्यमंत्र्यांसोबत १६ ते १७ मंत्री शपथ घेऊ शकतात. सूत्रांच्या मते भाजप-जदयूचे प्रत्येकी ७ आणि व्हीआयपी व हम या सहकारी पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराला मंत्रिपद मिळू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.