आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाची पत्नी साची मारवाहच्या कारचा दिल्लीत काही गुंडांनी पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. या गुंडांनी साचीच्या कारला धडकही दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचेही साचीने म्हटले आहे.
कार्यालयातून परतत असताना पाठलाग
याविषयी सविस्तर वृत्त असे की, नितीश राणाची पत्नी साची किर्ती नगरमधील तिच्या कार्यालयातून रात्री घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी तिच्या कारचा पाठलाग केला. यादरम्यान त्या गुंडांनी साचीच्या कारला धडकही दिली. साचीने कारमधून या दोघांचा फोटो काढत तो सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही
मी नेहमीप्रमाणे कारमधून घरी निघाले होते. या दोघांनी अचानक माझ्या कारला धडक द्यायला सुरूवात केली. काहीही कारण नसताना त्यांनी कारला धडक दिल्याचे साचीने यावर लिहिले आहे. यानंतर पोलिसांत तक्रार द्यायला गेल्यावर त्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आणि म्हटले की तुम्ही सुरक्षित घरी पोहोचला आहात तर आता राहू द्या. पुढच्या वेळी गाडीचा नंबर लिहून घ्या असे पोलिस म्हटल्याचे साचीने लिहिले आहे. यावरून पोलिसांवर तिरकस टीका करताना पुढच्या वेळी त्यांचा फोन नंबरही घेईल असे साचीने म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नंतर तक्रार दाखल करून घेत दोघांपैकी एका आरोपीला अटकही केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.