आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 200 विद्यार्थीनींचा लैंगिक छळ:प्राध्यापकाविरुद्ध FIR दाखल, शेकडो विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे आरोप; फर्स्ट ईयरपासूनच करायचा अश्लील वर्तन

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठातील (NLIU) प्रो. तपन मोहंती यांच्यावर 2 विद्यार्थीनींनी लैंगिक शोषणाचा (भादंवि-354) गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात 2 स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आलेत. तक्रारकर्त्या विद्यार्थीनी 7 दिवसांच्या समुपदेशनानंतर तक्रार करण्यास तयार झाल्याचा दावा त्यांना घेवून ठाणे गाठणाऱ्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. विद्यार्थी बार असोसिएशनशी संबंधित विद्यार्थ्यांनी दिव्य मराठीला सांगितले की, प्रो. मोहंती यांच्यावर मागील 20 वर्षांत छेडछाड व महागड्या भेटवस्तू घेवून परीक्षेत चांगले गुण देण्यासारखे गंभीर झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मोहंतींवर आपल्या निकटवर्तियांना चुकीच्या पद्धतीने टेंडर देण्याचाही आरोप केला आहे. त्यांच्या मते, ज्या-ज्या लोकांनी मोहंतींविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्यात आले. मोहंती पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थीनींवर वाईट हेतूने नजर ठेवतात. त्यांच्या या सवयीमुळे विद्यार्थीनी त्यांच्या वर्गात हजर राहण्यासही घाबरतात.

आरोपी प्रोफेसरचा विद्यापीठ प्रशासनात मर्यादेपेक्षा जास्त हस्तक्षेप आहे. यामुळेच आतापर्यंत त्यांच्या विरोधातील एकही तक्रार उच्च पातळीपर्यंत पोहचली नाही. विद्यार्थ्यांनी मोहंतींवर 200 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पण, बहुतांश विद्यार्थीनी भीती व लोकलाजेखातर पुढे आल्या नाही.

विद्यापीठ प्रशासनही पाठिशी

विद्यार्थ्यांनी यूनिव्हर्सिटी प्रशासनाचा आपल्याला भरपूर पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला आहे. मोहंतींवरील आरोपांची वस्तुस्थिती सर्वांपुढे यावी अशी विद्यापीठाची इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्या मते, कुलगुरू व्ही. विजय कुमार यांनी मोहंती यांच्यापुढे 2 पर्याय ठेवले होते. एक-राजीनामा देणे, दोन- फौजदारी खटल्याला सामोरे जाणे. मोहंतींनी 15 मिनिटे करुन राजीनामा दिला. पण, त्यानंतरही विद्यार्थ्यांनी मोहंतींना कायदेशीर अद्दल घडवण्याचा विडा उचलला आहे.

मोहंतींविरोधात डिजिटल पुरावे असल्याचा दावा
विद्यार्थ्यांनी आरोपी मोहंतींविरोधात आपल्याकडे टेक्स्ट मॅसेजपासून व्हिडिओ कॉलपर्यंत डिजिटल पुरावे असल्याचा दावा केला आहे. हे पुरावे पोलिसांनाही देण्यात आलेत. विद्यार्थी बार असोसिएशनशी संबंधित विद्यार्थी पुरावे गोळा करण्यासह अन्य पीडितांनाही उजेडात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मते, ज्या 2 विद्यार्थीनींनी एफआयआर दाखल केला आहे, त्यांनी धाडसाचे काम केले आहे. याची कल्पना त्यांच्या कुटूंबियांनाही नाही.

केव्हा काय झाले?
2 मार्च -
कौंसिल ऑफ सेल्फची विद्यार्थी बार असोसिएशनसोबत मीटिंग झाली. तिथे प्रो. मोहंती यांचे नाव न घेता त्यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडले.
3 मार्च -विद्यार्थी-विद्यार्थीनींची व्हीसींसोबत खूली चर्चा. त्यातही विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली.
4 मार्च -विद्यार्थ्यांनी व्हीसींसोबत गोपणीय चर्चा करुन मोहंतींचे नाव उघड केले. या बैठकीत मोहंतींवर लैंगिक शोषणासह महागड्या भेटवस्तू घेवून गुणदान करणे व आपल्या निकटवर्तियांना टेंडर देण्यासारखे आरोप केले.
8 मार्च -महिला दिनी मोहंतींनी महिला सक्षमीकरणावर एक लेख लिहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष वाढला.
10 मार्च -प्रो. मोहंतींनी 5 विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत धमकावण्याची तक्रार केली.
11 मार्च -विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेवून प्रोफेसरची तक्रार केली. त्याच दिवशी चौहान यांनी पोलीस महासंचालक व भोपाळच्या पोलीस आयुक्तांना प्रकरणाची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
17 मार्च -सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाने बसद्वारे 5.15 च्या सुमारास विद्यार्थीनींना पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पाठवले. तिथे त्या जवळपास तासभर थांबल्या. त्यानंतर महिला पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदवली.

बातम्या आणखी आहेत...