आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NMC Allows NOC To Ukraine Returned Indian Medical Students I Latest News And Update 

युक्रेनवरून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा:एनएमसीने दिली एनओसी; देशातील कोणत्याही महाविद्यालयातून शीक्षण पूर्ण करता येणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण रखडले होते. आता नॅशनल मेडिकल कमिशनने युक्रेनमधून शीक्षण अर्ध्यावर सोडून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आयोगाच्या वतीने मंगळवारी याबाबतची एनओसी (नाहकरत प्रमाणपत्र) जाहीर केली आहे. त्यानुसार हे विद्यार्थी आता देशातील आणि जगातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. तथापि, आयोगाने असेही म्हटले आहे की, या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलेशन, 2002 चे इतर निकष पूर्ण करावे लागतील.

पुनर्स्थापना तात्पुरती असेल, पदवी मात्र युक्रेन विद्यापीठातूनच मिळेल

यामध्ये खरं तर, काही युक्रेन वैद्यकीय विद्यापीठांनी सर्वात जास्त प्रभावित युद्ध क्षेत्रांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना गतिशीलता किंवा हस्तांतरण कार्यक्रम घेण्यास सांगितले होते. यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाने हा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाने याला तात्पुरते स्थलांतर म्हटले आहे. त्यामुळे मूळ युक्रेनमधील विद्यापीठच विद्यार्थ्यांना पदवी देणार आहे. युक्रेनमधून परतलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी तात्पुरता उपाय म्हणून भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शीक्षण करण्याची अर्थात जागांची मागणी केली होती. दरम्यान, या विषयावर अद्यापही राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पूर्वी संबंधित संस्थेतूनच शीक्षण घेता येत असे
आयोगाने पूर्वीच्या नियमात म्हटले होते की, अभ्यासक्रमादरम्यान संपूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण, इंटर्नशिप किंवा क्लर्कशिप एकाच परदेशी वैद्यकीय संस्थेतून पूर्ण केली जाईल. म्हणजेच, प्रशिक्षण किंवा इंटर्नशिपचा कोणताही भाग इतर कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातून केला जाणार नाही.

विविध देशात वैद्यकीय शीक्षणाच्या लागणारा खर्च वरिल चार्टमध्ये दिसून येत आहे.
विविध देशात वैद्यकीय शीक्षणाच्या लागणारा खर्च वरिल चार्टमध्ये दिसून येत आहे.

खाजगी महाविद्यालयातील प्रवेशाबाबत निर्णय नाही

युक्रेनमधून परतलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी तात्पुरता उपाय म्हणून भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागांची मागणी केली होती. तथापि, अद्याप या विषयावर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग किंवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

यामुळे भारतीय विद्यार्थी युक्रेनला शीक्षणासाठी जात असत
आजही भारतासारख्या देशात एमबीबीएस पदवी ही उत्तम रोजगाराची हमी देणारी आहे. भारतात एमबीबीएसच्या फक्त 88 हजार जागा आहेत, परंतु 2021 मध्ये, 8 लाखांहून अधिक उमेदवारांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा, NEET मध्ये भाग घेतला. म्हणजेच दरवर्षी 7 लाखांहून अधिक उमेदवारांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. यामुळेच डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो भारतीय तरुण दरवर्षी युक्रेनसह अन्य देशांमध्ये जातात.

परदेशात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश का घेतला जातो

  • परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणतेही देणगी शुल्क भरावे लागत नाही
  • वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही परीक्षेची आवश्यकता नाही.
  • युक्रेनसारख्या देशात वैद्यकीय अभ्यासाचे शुल्क भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.
बातम्या आणखी आहेत...