आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NMCG Said This Violated The Karena Protocol, Human Rights Commission Sent Notices To The Center, Bihar, Uttar Pradesh Government; News And Live Updates

गंगेतील वाहत्या मृतदेहांचे प्रकरण:एनएमसीजीने सांगितले - हे कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन; मानवाधिकार आयोगाने केंद्र, बिहार, उत्तर प्रदेश सरकारला बजावल्या नोटिस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उन्नावमधील गंगा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करताना लोक

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत सतत मिळणार्‍या मृतदेहांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. वृत्तानुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) देखील संबंधित प्रकरणाची दखल घेतली असून केंद्र सरकार, बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारण गंगा नदीच्या पात्रात मृतदेह आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी त्या मृतदेहांना वाळूत दफन करत आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनने (एनएमसीजी) हे प्रकरण कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

एनएचआरसीने केंद्र, बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारकडून चार आठवड्यात जाब विचारला आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत कोणती कारवाई केली हेदेखील सांगावे लागणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाशी संबंधित केंद्रीय संस्था एनएमसीजीने संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.

एनएमसीजीचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा सांगतात की, “गंगा नदीमध्ये मृतदेह किंवा सांगाडे फेकणे हे कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. यामुळे केवळ नदी प्रदूषित होत नाही, तर गंगेच्या काठावरील गावांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. हे रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत.” संबंधित प्रकरणात एनएचआरसीने बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी हे पत्र लिहिले आहे.

उन्नावमध्ये वाळूत 900 पेक्षा जास्त मृतदेहांचे दफन
कोरोनाकाळातील सर्वात मोठी स्मशानभूमी उन्नावमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण येथीलच शुक्लगंज घाट आणि बक्सर घाटाजवळ 900 हून अधिक मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. दैनिक भास्करच्या पत्रकाराने या दोन्ही ठिकाणी तपास केला. दरम्यान, तेथे प्रत्येक चरणात मानवी अवयव विखुरलेले दिसतात. दैनिक भास्करच्या स्पष्टीकरणानंतर प्रशासन झोपेतून जागा झाला आणि घाईगडबडीने सर्व मृतदेहांना वाळूत पुरुन टाकले.

बातम्या आणखी आहेत...