आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसनिर्मिती रखडणार:एका कंपनीशी करार नाही, दुसऱ्या कंपनीला तयारीसाठी वेळ हवा

मुंबईहून विनाेद यादव, बुलंदशहरहून एम. रियाझ हाश्मी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दावे आणि वास्तव : काेव्हॅक्सिनच्या उत्पादनात विलंबाची शक्यता
  • मुंबईच्या कंपनीशी अद्याप करार नाही, बिबकाॅलमध्ये टीम गेलीच नाही

काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी हाेत असताना संशाेधक व तज्ञ सातत्याने तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहेत. यातून वाचण्यासाठी जास्तीत जास्त लसीला सर्वात महत्त्वाचे शस्त्र मानले जात आहे. परंतु लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण कार्यक्रम मंदावला आहे. लस उत्पादन वाढवण्यासंबंधीचे वास्तवदेखील वेगळे आहे. केंद्र सरकारने भारत बायाेटेकच्या काेव्हॅक्सिनच्या उत्पादन वाढीसाठी दाेन नव्या कंपन्यांशी कराराचा दावा केला. परंतु त्याची गती मंद आहे. त्यामुळे लसींचे अपेक्षित उत्पादन सुरू हाेऊ शकलेले नाही.

मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटशी आतापर्यंत भारत बायाेटेकचा सामंजस्य करारच झालेला नाही. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील बिबकाॅलशी (भारत इम्युनाॅलाजिक अँड बायाेलाॅजिक काॅर्पाेरेशन लिमिटेड) मात्र सामंजस्य करार झाला आहे. परंतु भारत बायाेटेकची टीम अद्याप तेथे पाेहोचू शकलेली नाही. कारण पहिल्यांदा टीम येईल. त्यानंतर प्रयाेगशाळा तयार हाेईल. त्यासाठी महिनाभराचा काळ जाईल. त्यानंतर उत्पादन सुरू हाेईल. म्हणजे संपूर्ण तयारीसाठी किमान तीन महिने लागतील. सप्टेंबरमध्ये काेव्हॅक्सिनच्या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे बिबकाॅलमध्ये प्रमुख संशाेधक व तंत्रज्ञ काेराेनामुळे बाधित झाले आहेत. अशी संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. त्यातून लस निर्मितीलादेखील विलंब हाेऊ शकताे. बुलंदशहर येथील केंद्र सरकारचा उपक्रम बिबकाॅलमध्ये दर महिन्याला एक काेटी लस म्हणजेच २ काेटी डाेस उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

देशात सलग चार दिवस १५ लाखांहून कमी डाेस दिले
एकीकडे सरकार लसींचे उत्पादन वाढवण्याची कसरत करत आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेग मंद हाेत चालला आहेसाेमवार ते गुरुवारपर्यंत सलग चाैथ्या दिवशी १५ लाखांहून कमी डाेस देण्यात आले. त्याआधी आकडे १५ लाखांहून जास्त हाेते.

महाराष्ट्र : हाफकिनशी अद्याप करार नाही, लसीसाठी केंद्राने केले सुमारे १६५ कोटी मंजूर भास्करने मुंबईत हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, तूर्त तरी भारत बायोटेकशी तंत्रज्ञान हस्तांतरण होणे बाकी आहे. करार होत नाही तोवर कोणतीही प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. या करारासाठी केंद्राने सुमारे १६५ कोटी मंजूर केले आहेत. हाफकिनने भारत बायोटेकला याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.

६ राज्यांत १ काेटीहून जास्त लाेकांना लस, सर्वाधिक २ काेटी महाराष्ट्रात : २१ मेपर्यंत देशात १९.३३ काेटी लाेकांना लस दिली. त्यापैकी १५.५ काेटींना पहिला डाेस व ४.२८ काेटी लाेकांना दुसरा डाेस दिला. एक काेटीहून जास्त डाेस दिले गेलेली सहा राज्ये आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आहे. महाराष्ट्रात २ काेटींहून जास्त डाेस देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...