आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Ambulance stretcher Found, 2 Km Walk With Father in law On His Back; But Unfortunately Could Not Save Lives

धीराोदात्त:रुग्णवाहिका-स्ट्रेचर मिळाले नाही, सासऱ्यांना पाठीवर घेऊन 2 किमी चालली सून; पण दुर्दैवाने वाचवू शकली नाही जीव

गुवाहाटी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अासाममधील नगाव येथे राहणाऱ्या २४ वर्षांच्या निहारिका दासचे हे छायाचित्र. काेराेना पाॅझिटिव्ह असलेले अापले सासरे थुलेश्वर दास यांना पाठीवर घेऊन जात असताना दिसत अाहे.

निहारिका म्हणते, हे छायाचित्र २ जूनचे अाहे. सासऱ्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना घेऊन कशीबशी अाराेग्य केंद्रात पाेहोचले. डाॅक्टरांनी त्यांना २१ किमी दूर असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पण ना रुग्णवाहिका दिली ना स्ट्रेचर. त्यामुळे रिक्षा स्टँडपर्यंत जाण्यासाठी त्यांना पाठीवर उचलून २ किलाेमीटर घेऊन गेले. हे सर्व हाेत असताना लाेक बघत हाेते. पण काेणीही मदत केली नाही. निहारिकादेखील पाॅझिटिव्ह अाहे. ५ जूनला दाेघांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात अाले हाेते. येथे साेमवारी थुलेश्वर यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...