आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Compensation Will Be Given To Those Who Died Due To Drinking Chief Minister Nitish Kumar

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा ठाम पवित्रा:मद्यपान करून मृत्यू झालेल्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विषारी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 55 पेक्षा जास्त, विधानसभेत गदारोळ

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५५ पेक्षा जास्त झाली आहे. परंतु मद्यपान करून मृत्यू झालेल्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने विधिमंडळ तसेच रस्त्यावर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला. नितीशकुमार यांनी मात्र दारू पिणारा मरणारच, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

त्यातच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने बिहार सरकार व डीजीपीला नोटीस पाठवली आहे. बिहार विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही या मुद्यावरून गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. प्रश्नोत्तराच्या काळात सभागृहात यावरून वातावरण चांगलेच तापले होते.

बातम्या आणखी आहेत...