आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात १२ वर्षांखालील वयाच्या मुलांना कोरोना लस द्यायला पाहिजे की नाही, यावर सध्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनमध्ये (एनटागी) चर्चा सुरू आहे. दरम्यान, देशातील प्रख्यात तज्ज्ञांच्या मते, या वयाच्या मुलांना लसीची गरजच नाही. कारण सध्या कुठलीही आपत्कालीन स्थिती नाही. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत वापराची परवानगी देण्याचा काही अर्थच नाही. तज्ज्ञांच्या मते, लसीला पूर्णपणे परवानगी मिळाल्यानंतर आणि दीर्घकाळाचा सेफ्टी डेटा उपलब्ध झाल्यानंतरच मुलांना लस देण्याबाबत विचार करावा. घाई करण्याची काहीही गरज नाही.
एनटागीने १२-१५ वर्षांसाठीही शिफारस केली नाही प्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्ट आणि व्हायरॉलॉजिस्ट डॉ. गगनदीप कंग यांनी सांगितले की, एनटागीने १२ ते १५ वर्षांच्या मुलांनाही लस देण्याची कुठलीही शिफारस केली नव्हती. त्याचा निर्णय नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९ ने (नॅगवॅक) घेतला होता.
बायोटेकने २ ते १८ वर्षांच्या मुलांवर बूस्टरच्या चाचणीची परवानगी मागितली भारत बायोटेकने २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवर कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोससंबंधी दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी औषधी नियामकांकडे परवानगी मागितली आहे. सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डचा आपत्कालीन डोस १८ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या अशा लोकांना दिला जातो, ज्यांना दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले आहेत. हैदराबादच्या कंपनीने २९ एप्रिलला डीसीजीआय यांच्यासमोर अर्ज सादर करून कोव्हॅक्सीनच्या बूस्टर डोसच्या चाचणीची परवानगी मागितली.
हा अभ्यास दिल्ली आणि पाटणा एम्ससहित सहा ठिकाणी केला जाईल.
तर्क-1 : कोणती लस जास्त प्रभावी याचा अभ्यास करावा पूर्ण परवानगी मिळत नाही तोपर्यंत या वयाच्या मुलांना लस देण्याचा निर्णय योग्य नाही. मुलांसाठी कोणती लस जास्त प्रभावी आणि सुरक्षित आहे याचा तुलनात्मक अभ्यास व्हावा. कुठलीही घाई नको. - डॉ. गगनदीप कंग, मायक्रोबायोलॉजिस्ट व व्हायरॉलॉजिस्ट
तर्क-2 : मुलांना अडचण नाही, मग लसीची घाई का? मुलांना अडचण येत नाही हे माहीत आहे, मग लस देऊन तिच्या साइड इफेक्टचा धोका घेण्याची गरज काय? काही मुलांनाच लसीनंतर त्रास होत असेल तरीही या वयाच्या मुलांना लस देण्याची गरज नाही. - प्रा. संजय राय, दिल्ली एम्सच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे डॉक्टर
तर्क-3 : लहान मुलांना अनेक आजार, सर्वांची लस देत नाहीत जी मुले कॅन्सर, एचआयव्ही, कमी प्रतिकारशक्ती यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना लस दिली जाऊ शकते. मुलांना अनेक प्रकारचे आजार असतात, पण सर्वांपासून बचावासाठी लस देत नाहीत. त्यामुळे कोणत्या आजारापासून धोका आहे त्याचीच लस देण्याबाबत विचार करावा लागेल.- डॉ. रमण गंगाखेडकर, सेवानिवृत्त वैज्ञानिक, ICMR
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.