आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Decision To Merge NEET And JEE Between CUET I UGC Chairman M. Jagdish Kumar I 

CUET मध्ये NEET आणि JEE विलीन करण्याचा निर्णय नाही:UGC अध्यक्ष एम. जगदीश; म्हणाले- विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणार

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांपैकी JEE आणि NEET UG परीक्षांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या संदर्भात यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार म्हणाले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE ही CUET UG मध्ये विलीन करण्याबाबत कोणताही औपचारिक निर्णय घेण्यात आलेला नाही. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर असा कोणताही नवीन नियम लादला जाणार नाही. सोशल मिडीयावर त्यांनी ही माहिती दिली.

11,12 वी च्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही

यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी आश्वासित केले की, सध्या इयत्ता 11 आणि 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. यापुढे पुरेशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार आहे "एखादा निर्णय घेतला असला तरी, सध्या 11वी आणि 12वीत असलेल्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही. आम्हाला त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान पुढील दोन वर्षे तरी या परीक्षांमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही.

15 सप्टेंबरपर्यंत होईल निकाल होतील जाहीर

यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, CUET यूजी निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. तसेच, एजन्सीद्वारे प्रयत्न देखील केले जात आहेत की शक्य असल्यास CUET UG-2022 चा निकाल एक-दोन दिवस आधी जाहीर केला जाऊ शकतो. यूजीसी प्रमुखांनी सहभागी विद्यापीठांना यूजी प्रवेशासाठी वेब पोर्टल तयार ठेवण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...