आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Fear Of Corona: In Mumbai Migrant Laborers Traveling In General Compartment Without Mask And Social Distancing

मुंबईतील भयावह चित्र:लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांचे पुन्हा पलायन सुरू, यूपी-बिहारच्या ट्रेन बनू शकतात सुपर स्प्रेडर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्दी पाहता 6 स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकटांची विक्री बंद
  • हे स्टेशन LTT, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल आणि CSMT आहेत

लॉकडाऊनच्या भीतीने पुन्हा एकदा प्रवासी मजुरांचे पलायन सुरू झाले आहे. हे लोक आपल्या घरी परतत आहेत. मुंबईमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनपासून यूपी जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. जनरल डब्ब्यांमध्ये तर लोक एकमेकांवर बसून प्रवास करत आहेत. पुणे आणि नागपुरातही हिच परिस्थिती आहे. या ट्रेन सुपर स्प्रेडर बनू शकतात आणि संक्रमणाचा धोका अजून वाढू शकतो. आम्ही मुंबईच्या LTT स्टेशनवर जाऊन जाणून घेतले की, लोकांना कोरोनापेक्षा जास्त भीती लॉकडाऊनची आहे.

LTT स्थानकात गाड्यांच्या सामान्य कोचमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट लोक होते. लोक डब्यात नीट उभेही राहू शकत नव्हते. बहुतेकांचे चेहरे मास्क किंवा कपड्यांनी झाकलेले होते परंतु या परिस्थितीत सोशल डिस्टेंसिंग पालन करणे अशक्य होते. सीट आणि फ्लोरवर जागा मिळाली नाही तर लोक छतावर चादर टाकून बसले. गोरखपूर जात असलेल्या ट्रेनमध्ये तर लोक गेटवर लटकून प्रवास करत होते.

प्रवाशांनी सांगितले या धोकादायक प्रवासाचे कारण
लखनऊला जाणारे परवेझ आलम म्हणाले, 'लॉकडाऊन होण्याची शक्यता असल्याने काम सापडत नाही. इथे काय करणार, यामुळे परत जात आहोत. कोरोनाच्या मागच्या लाटेच्या वेळी यावर्षी जानेवारीमध्ये बारबंकी (UP) येथून मुंबईला परतलेले रामेश्वर पुन्हा घरी रवाना होत आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका खाजगी कापड कारखान्यात काम मिळाले, पण 4 दिवसांपूर्वी कंपनीच्या मालकाने नोकरीवरून काढून टाकले. आता घरी परतण्याशिवाय पर्याय नाही. यूपीला जाणारा सर्वेश त्रिपाठी म्हणाला, मागच्या वेळेप्रमाणे पायी जाण्यापेक्षा ट्रेनमध्ये उभ्या-उभ्या 30-35 तासांचा प्रवास करणे चांगले आहे.

यूपीच्या पंचायत निवडणुका देखील गर्दीमागील एक कारण आहे
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अचानक वाढ होण्याचे एक कारण यूपीमधील पंचायत निवडणुका असल्याचेही बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात 14 एप्रिल ते 28 एप्रिल या चार टप्प्यांमध्ये पंचायत निवडणुका आहेत. आपल्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांना गावी जायचे आहे. याच कारणामुळे यूपी बिहारकडे जाणार्‍या सर्व गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढली आहे.

कॉंग्रेस नेते निरुपम म्हणाले- हे कामगार इतर राज्यातही कोरोना पसरवतील
कॉंग्रेस नेते संजय निरुपम LTT स्थानकात पोहोचले. ते लोकांना समजावण्यासाठी गेले. तो म्हणाले - लोकांना लॉकडाऊनची भीती आहे. ट्रेनमधील गर्दी संक्रमित होईल आणि ते इतर राज्यात कोरोना पसरतील. जेव्हा ते परत येतील तेव्हा कोरोना पळून गेलेला असेल का? कामगारांवर लॉकडाऊन एक संकट बनून आला आहे. यामुळे बेरोजगारी होईल. लॉकडाउन निर्णय लवकरात लवकर सरकारने मागे घ्यावा.

पुण्यातील स्थानकाबाहेरही प्रचंड गर्दी दिसून आली पुणे स्टेशनमध्येही गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी होत आहे. उत्तर भारताकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्या फूल आहेत. पुण्याचे पीआरओ मनोज झंवर म्हणाले, आम्ही स्टेशनमध्ये केवळ कन्फर्म केलेल्या तिकीटधारकांना प्रवेश देत आहोत. स्थानकांच्या बाहेर गर्दी दिसण्याचे कारण हे आहे. पुण्याहून काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु त्याही फूल आहेत.

बातम्या आणखी आहेत...