आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दिलासा नाही:कोणतीही भारतीय महिला तिच्या पतीची विभागणी करू शकत नाही : हायकोर्ट

प्रयागराज16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद हायकोर्टाने एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीची याचिका फेटाळली आहे. पतीने खालच्या कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत याचिका दाखल केली होती. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून मुक्त करण्याची मागणी त्याने केली होती. न्यायाधीश राहुल चतुर्वेदी यांचे पीठ म्हणाले, आपला पती एखाद्या महिलेकडून शेअर केला जाणे किंवा तो आणखी एखाद्या महिलेशी लग्न करणे, हा त्याच्या पत्नीसाठी मोठा धक्का असेल. अशा विचित्र स्थितीत तिच्याकडून कोणत्याही प्रकारच्या समजूतदारपणाची अपेक्षा करणे अशक्य आहे. वस्तुत: या प्रकरणातही असेच झाले. मृत महिलेने आत्महत्येपूर्वी आरोपी पती (सुशीलकुमार) आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दिल्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये भादंवि कलम ३२३, ४९४, ५०४, ५०६, ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पती आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आता त्याने घटस्फोट न देताच तिसऱ्यांदा लग्न केले आहे. या लग्नानंतर लगेच कुटुंबातील इतर सदस्यांच्या (इतर आरोपी) हे लक्षात आले तेव्हा त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन, छळ करत मारहाण केली. यामुळे तिने मृत्यूचा मार्ग निवडला.

पती-पत्नी २ स्तंभ, एक कमकुवत झाल्यास घर कोसळते : न्यायालय
नवी दिल्ली | दिल्ली हायकोर्टाने सांगितले की, पती -त्नी कुटुंबाचे २ स्तंभ आहेत. ते एकत्रितपणे कोणत्याही स्थितीचा सामना करू शकतात व कुटुंबाला संकटकाळात संतुलित ठेवू शकतात. त्यातील एक स्तंभ कमकुवत होतो किंवा तुटतो तेव्हा संपूर्ण घर कोसळते. कोर्टाने ही टिप्पणी पतीच्या वर्तनावरून पत्नीला दिलेल्या घटस्फोटाशी संबंधित कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत केली आहे. कार्यकारी मुख्य न्यायाधीश विपिन सांघी यांच्या पीठाने पतीचे अपील फेटाळत सांगितले, पती या न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यात अपयशी ठरला.

बातम्या आणखी आहेत...