आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Materials, No Ground... The Village Has No Road, But Won 62 Medals With The Strength Of Stubbornness

प्रेरणादायी:ना साहित्य, ना  मैदान... गावाला रस्ताही नाही, मात्र जिद्दीच्या बळावर 62 पदके जिंकली

प्रतापगडहून (उप्र) उज्ज्वल सिंह14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपीच्या या गावातील तरुणांना खेळांतून लष्करात नोकऱ्यांची संधी

लखनऊपासून १८० किलोमीटरवरील प्रतापगड जिल्ह्यात संग्रामपूर (मधई का पुरवा) हे गाव आहे. या गावाला तीन बाजूंनी नदी आणि एका बाजूने लोहमार्गाचा वेढा आहे. रस्ते आणि विकास या गावापर्यंत पोहोचले नसले तरी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील ६२ पदके या गावात पोहोचली आहेत. याचे श्रेय तरुणांना आहृे. एकही सुविधा नसताना त्यांनी खेळांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून संग्रामपूरचे नाव देश-जगात प्रसिद्ध केले आहे.

गावात पाय ठेवताच खेळांच्या बाबतीत असलेले वेड दिसून येते. भल्या पहाटे नदीकाठावर एक डझनपेक्षा अधिक मुले विविध खेळांचा शिस्तीत सराव करत होेती. दोन-तीन तरुण त्यांना प्रशिक्षण देत होते. प्रशिक्षकाशी संवाद साधल्यानंतर त्याचेे नाव मोहंमद इबरार असल्याचे कळले. ते हवाई दलात ज्युनियर वॉरंट ऑफिसर पदावर गाझियाबाद येथे कार्यरत आहेत. सध्या त्या सुटीवर आले आहेत. इबरार हे धावपटू आणि लांब उडीचे खेळाडू आहेत. खेळासाठीच्या कोट्यातून त्यांची हवाई दलात निवड झाली आहे. गावात खेळांची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली आहे. इबरार सांगतात की, सुविधा नसल्याने नदीकाठी याच मैदानावर मी सराव करत होतो. सर्वात आधी जिल्ह्याच्या स्पोर्ट््स स्टेडियममध्ये प्रथम स्थान मिळाल्यानंतर आवड वाढली. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ पदके जिंकत गेलो. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (ढाका) सुवर्णपदक, एशियन इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (इराण) कांस्यपदक जिंकले. बुटांशिवाय धावणारे इबरार यांच्या यशानंतर गावातील तरुण खेळांतील संधी शोधू लागले. मोहंमद हदीस गावाच्या टीममध्ये वेगवान गोलंदाज होता. त्याचा वेग पाहून लोकांनी त्याला भालाफेकीचा सराव करण्यास प्रवृत्त केले. सुविधांच्या अभावामुळे त्याने इंटरनेटवरून माहिती गोळा करून लाकडी भाला तयार करून सराव सुरू केला. २०१२ मध्ये लखनऊ येथील गुरू गोविंदसिंह स्पोर्ट््स कॉलेजमध्ये त्याची निवड झाली. २०१४ मध्ये त्याने विजयवाडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत मध्य प्रदेशकडून खेळत कांस्यपदक मिळवले. २०१५ मध्ये कॉमनवेल्थसाठी त्याची निवड झाली. तेथे हदीसने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. हदीस सध्या भोपाळमध्ये कोच आहे.

पदके जिंकण्यासह विक्रमही रचत आहेत गावातील खेळाडू
याच गावातील शाहरुख खानने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय पातळीवर ज्युनियर नॅशनल अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण आणि देशात पहिले स्थान प्राप्त केले. गेल्या डिसेंबरमध्ये शाहरुखने ३००० मीटर धावण्यात सुवर्णपदक जिंकले. सर्वात कमी वेळेत हे अंतर कापण्याचा विक्रमही त्याने केला. १६ वर्षांच्या शेख नायाबने अडथळ्यांच्या शर्यतीत मंुबईकडून सीबीएसई राज्य पातळीवरील सुवर्णपदक जिंकले. सीबीएसई नॅशनलमध्ये २०२२ मध्ये रौप्यपदक जिंकले. गावातील प्रत्येक मुलाचे लक्ष्य खेळात देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे आहे. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरीत संधी मिळाली आहे. गोळाफेकपटू इकरार खान स्पोर्ट््स कोट्यातूनच लष्करात नायक आहेे.

बातम्या आणखी आहेत...