आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सिन अपडेट:विषाणू कितीही बदलला तरी सहा आठवड्यांत अपडेट होणार लस, नवीन स्ट्रेनमुळे रुग्ण वाढले, मृत्यू नाही

नवी दिल्ली / पवनकुमार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमधील कोरोनोच्या नव्या स्वरूपास घाबरू नका

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्वरूपामुळे (स्ट्रेन) घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. डॉ. स्वामिनाथन यांनी दैनिक भास्करला सांगितले की, जगभरात तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस विषाणूच्या नव्या स्वरूपावरदेखील प्रभावी ठरणारी आहे. ९ ते १० महिन्यांतील कोरोना विषाणूतील बदल साधारण आहे. बदल लक्षात घेऊनच लस तयार केली जाते. तज्ज्ञांनुसार, विविध घटकांपासून लस तयार होत आहे. भारतातील लस प्रोटीनआधारित आहे. ही लस ४ ते ६ आठवड्यांत अपडेट करता येऊ शकते. यामुळे विषाणूच्या नव्या स्वरूपामुळे घाबरण्याची गरज नाही.

भारतात किती स्ट्रेन आहेत, त्यांच्यातील अंतर किती?
आयसीएमआरचे माजी शास्त्रज्ञ प्रा.रमण गंगाखेडकर यांच्यानुसार, भारतात जिनोम सिक्वेन्सिंग जास्त प्रमाणात झालेली नाही. याद्वारे विषाणूतील बदल जाणता येतो. आतापर्यंत झालेल्या सिक्वेन्सिंगनुसार, भारतात सुरुवातीच्या टप्प्यातील विषाणूचे स्वरूप चीनमधील वुहानप्रमाणे होते. नंतर इटली व इतर युरोपीय देशांतील स्वरूपही आढळले.

हा विषाणू भारतात आल्यास किती परिणाम होईल?
विशेष परिणाम होणार नाही. येथे आधीपासूनच विषाणूची अनेक स्वरूपे आहेत. नव्या स्वरूपावर युरोपात झालेल्या संशोधनानुसार, हा विषाणू वेगाने पसरतो. मात्र यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. ब्रिटनमध्ये स्ट्रेननंतर दिवसाला १४ हजारांहून २९ हजार रुग्ण आढळत आहेत, तर ४०० ते ५०० मृत्यू झाले आहेत.

ब्रिटनहून भारतात आलेले ३० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह आढळले. यापैकी किती जणांमध्ये नवे स्वरूप आहे?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कुठलाही अधिकारी यावर बोलायला तयार नाही. जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट साधारणत: ३६ तासांत मिळतो. मात्र ब्रिटनमधून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींचा रिपोर्ट तीन दिवसांनंतरही मिळालेला नाही.

नव्या स्वरूपामुळे लसीचा प्रभाव कमी होईल का?
भारत बायोटेक कंपनीकडून तयार होणाऱ्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची जबाबदारी सांभाळणारे कम्युनिटी मेडिसिनचे डॉ. संजय रॉय म्हणाले, विषाणूत नेहमी बदल होत असतो. मात्र, मूळ प्रवृत्तीत बदल होत नाही. यामु‌ळे आतापर्यंत समोर आलेल्या सर्वच लसी प्रभावी ठरतील. विषाणूतील बदल लक्षात घेऊनच लस तयार केली जात आहे. लसीत अनेक प्रोटीन असतात.

नव्या स्वरूपामुळे जगभरात विनाकारण दहशत पसरलेली आहे का?
सर्व देशांकडून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. नवीन स्वरूपातील विषाणू वेगाने पसरत असल्यामुळे भीती पसरली आहे. व्हायरोलॉजिस्ट प्रा. शाहिद जमील म्हणाले, नवीन स्वरूपातील विषाणू मूळ विषाणूपेक्षा फार काही वेगळा नाही. हा लसीने नष्ट करता येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...