आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान माेदी म्‍हणाले:भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असाे, तिची गय करू नका, भ्रष्टाचार सर्वात माेठा अडथळा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयच्या हीरक जयंती समारंभात मार्गदर्शन

भ्रष्टाचाराच्या विराेधात लढाईसाठी आज राजकीय इच्छाशक्तीची काहीही कमतरता नाही. म्हणूनच अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी लाेकांवर बेधडक कारवाई करावी. भले ताे कितीही शक्तिशाली असला तरी त्याची गय करू नये, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी म्हटले आहे. ते साेमवारी सीबीआयच्या हीरक जयंती समारंभात बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले, भ्रष्टाचारातून अनेक दशके लाभ मिळवणाऱ्यांनी एक प्रकारची व्यवस्था तयार केली आहे. ही व्यवस्था तपास संस्थांवर हल्ले करते. परंतु तपास संस्थांनी भ्रष्टाचाऱ्यांची शक्ती आणि कलंकित करण्यासाठी त्यांनी पसरवलेल्या गाेष्टींमुळे विचलित हाेण्याची गरज नाही. हे लाेक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. काेणत्याही भ्रष्ट व्यक्तीची गय करता कामा नये. आपल्या प्रयत्नात काहीही कसूर हाेऊ नये हीच देशाची इच्छा आहे. ही देशातील जनतेची इच्छा आहे. देश, कायदा आणि भारतीय राज्यघटना तुमच्यासाेबत आहे. आज देशामध्ये भ्रष्टाचाराच्या विराेधातील लढाई लढण्यासाठी पुरेशी राजकीय इच्छाशक्ती आहे. तुम्ही (सीबीआय) संकाेच बाळगू नका. कुठेही थांबण्याची गरज नाही, असे नरेंद्र माेदींनी स्पष्ट केले.

सीबीआयच्या हीरक जयंती समारंभ वर्षानिमित्त पंतप्रधानांनी एक टपाल तिकीट आणि त्या स्मरणार्थ नाणेदेखील जाहीर केले आहे. सीबीआयच्या ट्विटर हँडलचीही सुरुवात करण्यात आली. सीबीआयची स्थापना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून १ एप्रिल १९६३ राेजी झाली हाेती.