आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन गेमिंगसाठी केंद्राने गुरुवारी नवे नियम जारी केले. ऑनलाइन गेममध्ये सट्टेबाजी वा पैज लावणे शक्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी स्वयंनियामक संस्थांची (एसआरओ) स्थापना होईल. त्यात उद्योग जगतातील प्रतिनिधी, शिक्षण, बाल व इतर तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांचा समावेश असेल.
प्रत्यक्ष पैशांच्या (रिअल मनी गेम) खेळांना परवानगी द्यायची अथवा नाही किंवा एखादा गेम सट्टेबाजी, जुगार आहे वा नाही हे ठरवण्याचा अधिकारही एसआरओला असेल. या नियमांत ऑनलाइन रिअल मनी गेमची व्याख्या केली आहे. ज्या खेळांमध्ये जिंकण्याच्या आशेने पैसे अथवा वस्तू पणाला लावली जाते त्या खेळांना ऑनलाइन रिअल गेम समजले जाईल, असे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.
एसआरओ गेम्सवर देखरेख व नियमनही करतील. ऑनलाइन गेम्ससाठी एसआरओची परवानगी लागेल. ज्या अॅपमध्ये पैज लावणे वा सट्टेबाजीचा समावेश असेल एसआरओ त्याला परवानगी देणार नाही. दरम्यान, सट्टेबाजी व जुगाराच्या जाहिरातींविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.